संरक्षण मंत्रालय

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळा-2020

Posted On: 14 AUG 2020 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 74 वा स्वातंत्र्यदिन सोहळा ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पार पडेल. राष्ट्रध्वज फडकावून ते परंपरेने प्रतिष्ठित लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून भाषण करतील.

पंतप्रधानांचे सकाळी 07 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या लाहोर गेट येथे आगमन होईल त्याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे स्वागत करतील.

संरक्षण सचिव जनरल ऑफीसर कमांडिंग (जीओसी), दिल्ली क्षेत्र, लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांचा पंतप्रधानांना परिचय देतील. जीओसी दिल्ली क्षेत्र त्यानंतर पंतप्रधानांना सॅल्युटींग बेसकडे घेऊन जातील, ज्याठिकाणी संयुक्त आंतर-सेवा आणि पोलीस गार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनरल सॅल्युट करतील. त्यानंतर पंतप्रधान मानवंदना स्वीकारतील.

मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) ताफ्यात पंतप्रधानांसमवेत एक अधिकारी आणि लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलीस यांच्यातील प्रत्येकी एक असे एकूण 24 जण असतील. मानवंदना राष्ट्रीय ध्वजाच्या थेट समोर असेल.

यावर्षी, समन्वयक सेवेची जबाबदारी लष्कराकडे असल्यामुळे, गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्त्व लेफ्टनंट कर्नल गौरव एस येवलकर करतील. पंतप्रधानांच्या संरक्षण ताफ्यातील सैन्य दलाच्या ताफ्याचे नेतृत्व मेजर पलविंदर गरेवाल करतील, नौदलाच्या ताफ्याचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर के व्ही आर रेड्डी यांच्याकडे, तर हवाई दलाचे नेतृत्व स्क्वाड्रन लिडर विकास कुमार यांच्याकडे आहे आणि दिल्ली पोलीस ताफ्याचे नेतृत्व अतिरिक्त उप आयुक्त जितेंदर कुमार मीना करतील.

गढवाल रायफल्सची सेकंड बटालियन, लेफ्टनंट कर्नल जे टी इव्हाट यांच्या नेतृत्वाखाली 01 मार्च 1901 रोजी अस्तित्वात आली. भारतीय सैन्यदलाची ती एक वैभवशाली बटालियन आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात या बटालियनने अकरा युद्ध गौरव प्राप्त केले आहेत, हे दैदीप्यमान यश गणले जाते.

स्वातंत्र्यानंतर, बटालियनचा 1965 च्या युद्धात सक्रीय सहभाग होता. तसेच 1994 ते 1996 आणि 2005 आणि 2007 मधील ऑपरेशन रक्षक मोहिमेत काम करण्याची बटालियनला संधी मिळाली. बटालियनने 80 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

मानवंदना स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीकडे जातील, यावेळी त्यांचे स्वागत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम.एम.नरवणे, नौदल प्रमुख करमबीर सिंग आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया करतील. जीओसी दिल्ली क्षेत्र पंतप्रधानांना राष्ट्रीय ध्वज फडकावण्यासाठी मंचाकडे घेऊन येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर, नॅशनल गार्डकडून राष्ट्रध्वजाला ‘राष्ट्रीय सॅल्यूट’ दिला जाईल. लष्कराचे बँड पथक राष्ट्रध्वज फडकावताना आणि राष्ट्रीय सॅल्युट देताना राष्ट्रगीत सादर करेल. सैन्य दलातील सर्व गणवेशधारक उभे राहून मानवंदना देतील, त्यावेळी सर्वांनी उभे राहून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची विनंती आहे. बँड पथकाचे नेतृत्व सुभेदार मेजर अब्दुल गनी करतील.          

मेजर श्वेता पांडे पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी मदत करतील. राष्ट्रध्वज फडकावताना 2233 फिल्ड बॅटरीच्या शूर जवानांकडून 21 तोफांची सलामी देण्यात येईल. याचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिंग मेहता करतील आणि गन पोझिशन ऑफीसर नायब सुभेदार (एआयजी) अनिल चंद असतील.

राष्ट्रीय ध्वज ताफ्यात 32 जण असतील आणि लष्कर, नौदल, हवाईदल आणि दिल्ली पोलीस यांचा एक अधिकारी असेल आणि दिल्ली पोलीस राष्ट्रध्वज फडकावताना पंतप्रधानांना राष्ट्रीय सॅल्युट सादर करेल. लष्कराचे मेजर सूर्य प्रकाश आंतर-सेवा आणि पोलीस गार्डचे नेतृत्व करतील. नौदलाच्या ताफ्याचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर विवेग टिंगलू, हवाई दलाच्या ताफ्याचे नेतृत्व स्क्वाड्रन लिडर मयांक अभिषेक आणि दिल्ली पोलीस ताफ्याचे नेतृत्व अतिरिक्त उप आयुक्त सुधांशू धामा करतील.

राष्ट्रध्वज संचलनासाठी लष्कराचा ताफा गोरखा रायफ्लसच्या 5 व्या बटालिअनचा आहे. गोरखा रायफल्सची स्थापना जानेवारी 1942 मध्ये धरमशाला येथे करण्यात आली आणि नंतर 1946 मध्ये विसर्जन केले. पुन्हा 01 जानेवारी 1965 रोजी सोलन (हिमाचल प्रदेश) येथे गोरखा रायफल्सची पुर्नस्थापना करण्यात आली.

राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करतील. पंतप्रधानांच्या भाषणानंतर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे कॅडेटस राष्ट्रगीत सादर करतील. याप्रसंगी सर्व उपस्थितांना उभे राहून राष्ट्रगीत गाण्याची विनंती करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या विविध शाळांतील  500 एनसीसी कॅडेटस सहभागी होणार आहेत. 


* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645948) Visitor Counter : 249