गृह मंत्रालय

उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल गृहमंत्रालयाकडून पोलिसांचा विशेष पदकाने गौरव

Posted On: 12 AUG 2020 3:29PM by PIB Mumbai

 

उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 121 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला.  पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.

यावर्षी गौरवण्यात आलेल्या पोलिसांमध्ये 15 सीबीआयचे अधिकारी तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांचे  प्रत्येकी 15 अधिकारी, उत्तर प्रदेश पोलिसांचे 8, केरळ आणि पश्चिम बंगालचे प्रत्येकी 7 पोलीस अधिकारी आहेत आणि उर्वरित इतर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील अधिकारी आहेत. यात 21 महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

 

गौरवार्थींच्या यादीसाठी येथे क्लिक करा

 

U.Ujgare/S.Tupe /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645311) Visitor Counter : 203