रसायन आणि खते मंत्रालय
एनडीए सरकारने खत क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले – सदानंद गौडा
Posted On:
10 AUG 2020 5:49AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020
एनडीए सरकारने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी खत क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविल्याचे केंद्रीय रसायने आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.
गौडा म्हणाले की, कृषी उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी खत पोषकांचा अधिकतम वापर करण्याबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने आणि शेतकऱ्यांना खत उपयोगितेतील नवीन घडामोडींसंबंधी माहिती देण्यासाठी खत विभाग, कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग आणि कृषी संशोधन व शिक्षण यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सदानंद गौडा पुढे म्हणाले, खत आणि खत तंत्रज्ञानात संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी, खत विभागांतर्गत असणाऱ्या सीपीएसईजनी “इंडियन कौन्सिल फॉर फर्टीलायझर्स अँड फर्टीयाजर टेक्नॉलॉजी रिसर्च(ICFFTR)” या स्वतंत्र विचार गटाची स्थापना केली आहे. या परिषदेची 19 ऑगस्ट 2019 रोजी, संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. ही परिषद खत व खत निर्मिती तंत्रज्ञान, कच्च्या मालाचा वापर आणि उत्पादनांमध्ये नवीन शोध, विविध संशोधन संस्था, खत उद्योग व इतर भागधारकांच्या सहकार्याने या क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकासकार्य हाती घेईल. आतापर्यंत जनरल कौन्सिलने दोन बैठका घेतल्या आहेत आणि कार्यकारी समितीने तीन बैठक घेतल्या आहेत.

M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644828)
Visitor Counter : 227