रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेच्या आठ श्रेणींतील भरतीसंदर्भात खासगी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीविषयी स्पष्टीकरण
रेल्वेकडून होणाऱ्या नोकरभरतीची जाहीरात नेहमी रेल्वेकडूनच प्रसिद्ध केली जाते. कोणत्याही खासगी संस्थेला हा अधिकार नाही
कथित जाहीरात बेकायदेशीर असून ही फसवणूक आहे
संस्थेविरोधात रेल्वे कडक कारवाई करणार
Posted On:
09 AUG 2020 10:20PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे की, ““अव्हेस्ट्रेन इन्फोटेक” नावाची संस्था, जिचे संकेतस्थळ www.avestran.in आहे, या संस्थेने 8 ऑगस्ट 2020 रोजी एका प्रमुख दैनिकात जाहीरात प्रसिद्ध केली आहे आणि रेल्वेतील 5285 जागांसाठी 11 वर्षांच्या कंत्राटावर नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदाराला 750 रुपये ऑनलाईन शुल्क भरावयास सांगण्यात आले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2020 आहे, असे सांगण्यात आले आहे.
यामाध्यमातून सर्वांना सूचित करण्यात येते की, रेल्वेच्या कोणत्याही नोकरभरतीसंदर्भातील जाहिरात नेहमी रेल्वेकडूनच प्रसिद्ध केली जाते. कोणत्याही खासगी संस्थेला हा अधिकार नाही. त्यामुळे ही जाहिरात देणे बेकायदेशीर आहे.
यासंदर्भात, असेही स्पष्ट करण्यात येते की, रेल्वेच्या गट ‘सी’ आणि ‘डी’ गटाची भरती रेल्वेच्या 21 रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) आणि 16 रेल्वे भरती कक्ष (आरआरसी) यांच्याकडून केली जाते, कोणत्याही खासगी संस्थेकडून नाही. भारतीय रेल्वेतील नोकरभरतीला केंद्रकृत रोजगार समाचारच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्धी दिली जाते.
देशभरातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात. एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचारच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीसंदर्भात राष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि स्थानिक वर्तमानपत्रांना सूचक सूचना दिली जाते. तसेच जाहिरात आरआरबी/आरआरसीच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाते. आरआरबी/आरआरसीच्या संकेतस्थळाचा उल्लेख जाहिरातीत नमूद असतो.
पुढे आणखी स्पष्ट करण्यात येते की, रेल्वेने भरतीसंदर्भात कोणत्याही खासगी संस्थेला अधिकार दिले नाहीत, जसे वर नमुद केलेल्या जाहिरातीत नमूद केले आहे.
रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या संस्था/व्यक्तींविरूद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
**
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644665)
Visitor Counter : 269