पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राजामलाई, इदुक्की येथे झालेल्या भूस्खलनातील जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला; पीडितांना मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2020 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजामलाई, इदुक्की येथे झालेल्या भूस्खलनातील जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे, “राजामलाई, इदुक्की येथे भूस्खलन होऊन जीवितहानी झाली. याप्रसंगी मी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी झालेले लवकर बरे होवोत. एनडीआरएफ आणि प्रशासन कार्यस्थळी आहे, प्रभावित झालेल्यांना मदत पुरवण्यात येत आहे”.
पंतप्रधानांनी घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी (पीएमएनआरएफ ) मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.
* * *
D.Wankhede/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1644318)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam