पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी अहमदाबाद येथील रुग्णालयातील आग दुर्घटनेबद्दल व्यक्त केला शोक

Posted On: 06 AUG 2020 1:14AM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांनी अहमदाबाद येथील रुग्णालयातील आगीत प्राण गमाविलेल्या मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,"अहमदाबाद येथील रुग्णालयात लागलेल्या आगीने मी दु:खी झालो आहे. मृत्यूवियोग झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी मी शोक व्यक्त करत आहे.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो. मी मुख्यमंत्री विजय रुपानीजी आणि महापौर इबिजाल पटेलजी  यांच्याशी याबाबत बोललो आहे. प्रशासन संबंधितांना सर्वतोपरी मदत करत आहे".

 

Saddened by the tragic hospital fire in Ahmedabad. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to CM @vijayrupanibjp Ji and Mayor @ibijalpatel Ji regarding the situation. Administration is providing all possible assistance to the affected.

— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2020

U.Ujgare/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643703) Visitor Counter : 103