आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात गेल्या 24 तासांत 6.6 लाख नमुन्यांची चाचणी
28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात दररोज प्रति दशलक्ष 140 पेक्षा अधिक चाचण्या
Posted On:
04 AUG 2020 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020
गेल्या 24 तासात, देशात कोविडच्या, 6,61,892 चाचण्या करण्यात आल्या. यामुळे आजवर झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 2,08,64,750 इतकी झाली आहे आणि प्रती दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 15,119 इतके झाले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित आणि लक्ष्यकेन्द्री प्रयत्नांमुळे, देशभरात, चाचण्यांची संख्या वाढली आहे, आणि त्यामुळे लवकर निदान होऊन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण अलग ठेवण्यात यश आले आहे. ICMR च्या चाचण्या वाढविण्याच्या धोरणामुळे, देशात चाचण्यांच्या सुविधेचे जाळे निर्माण करण्यात यश आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने “कोविड-19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्याचे निकष आणि सामाजिक उपाययोजना” याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, संशयित रुग्ण शोधण्यासाठी, सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येक देशात दररोज प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात 140 चाचण्या होणे गरजेचे आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
देशात सध्या दररोज सरासरी प्रती दशलक्ष 479 चाचण्या होत आहे. मात्र देशातील 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात, दररोज प्रती दशलक्ष 140 चाचण्या होत आहे.
‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या दृष्टीकोनावर आधारित धोरणाचे लक्ष्य कोविड-19 च्या चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी दर कमी करणे हा आहे. सध्या देशात सरासरी पॉझिटिव्हीटी दर 8.89% इतका आहे. देशातील 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात हा दर 10% पेक्षा कमी असून, चाचण्या करण्याच्या धोरणाला यश येत असल्याचे हे निदर्शक आहे. हा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे केंद्र आणि राज्य/ केंद्रशासित प्रदेशांचे उद्दिष्ट आहे.
दररोज देशात 10 लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवत, चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. देशात सध्या चाचण्यांच्या प्रयोगशाळा 1356 इतक्या आहेत. यात सरकारी प्रयोगशाळा 917 आणि खाजगी प्रयोगशाळा 439 एवढ्या आहेत. यात : -
- रियल टाईम RT PCR आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 691 (सरकारी 420 + खाजगी 271)
- TrueNat आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 558 (सरकारी 465 + खाजगी 93)
- CBNAAT आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 107 (सरकारी 32 + खाजगी 75)
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643409)
Visitor Counter : 254