रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी हेल्मेटसाठी बीआयएस प्रमाणीकरण लागू करण्याबाबत जनतेकडून मागवल्या सूचना
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2020 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी स्वारांसाठी संरक्षक हेल्मेटला भारतीय मानक ब्यूरो कायदा 2016 नुसार सक्तीच्या प्रमाणीकरण अंतर्गत आणण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यामुळे देशात दुचाकी वाहनांसाठी केवळ बीआयएस प्रमाणित हेल्मेटची निर्मिती आणि विक्री करता येईल.यामुळे दुचाकी हेल्मेटची गुणवत्ता सुधारेल आणि रस्ता सुरक्षा परिस्थितीही सुधारेल तसेच दुचाकी वाहनांना होणाऱ्या प्राणघातक जखमा कमी करण्यात मदत होईल.
या संदर्भातील सूचना किंवा अभिप्राय सहसचिव (एमव्हीएल), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद पथ, नवी दिल्ली -110001(ईमेल: jspb-morth[at]gov[dot]in)यांना अधिसूचनेच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत पाठवता येतील.
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1642841)
आगंतुक पटल : 162