गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ चे स्वागत


“गेल्या 34 वर्षांत, भारताला अशा भविष्यवेधी धोरणाची आवश्यकता होती. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान व केंद्रीय शिक्षणमंत्री यांचे आभार, नवभारत निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय”

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ चा उद्देश समग्र आणि बहुशाखीय पद्धतीने भारतीय शिक्षण पद्धतीत अमुलाग्र परिवर्तन घडवून आणणे आणि बालकांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे”

Posted On: 29 JUL 2020 10:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ चे स्वागत केले आहे. आपल्या ट्वीट संदेशात गृहमंत्री म्हणतात शिक्षण हा कोणत्याही देशाचा पाया असतो आणि गेल्या 34 वर्षांपासून, भारताल अशा भविष्यवेधी धोरणाची आवश्यकता होती. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ रमेश पोखरीयाल यांचे स्वागत करतो, हा निर्णय नवभारत निर्मितीत अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

अमित शाह पुढे म्हणाले, हा खरोखर भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासातील उल्लेखनीय दिवस आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' मुळे शालेय आणि उच्च शिक्षणात नितांत आवश्यकता असलेल्या ऐतिहासिक सुधारणा घडून येतील.

केंद्रीय गृहमंत्री आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणाले जगातील कोणतेही राष्ट्र संस्कृती आणि मुल्ये सोडून प्रगती करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबतचे उद्दिष्ट सर्वांना उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करुन भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली शिक्षण प्रणाली निर्माण करणे आणि जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून भारताची पुनर्बांधणी करणे आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ समाजाच्या प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि हे सुनिश्चित करण्यासाठी एक विशेष संयुक्त कृती दलाची स्थापना केली जाईल. अमित शाह पुढे म्हणाले, उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण (Gross Enrolment Ratio) वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि धोरणात्मक पावले ऊचलली जातील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण-2020 ची वैशिष्ट्ये म्हणजे शालेय शिक्षणात नवीन पद्धती 5+3+3+4 प्रणाली, नवीन 4-वर्षांचा अभ्यासक्रम, सिंगल पॉईंट कॉमन रेग्युलेटरी सिस्टीम, शुल्क निश्चिती आणि उच्च शिक्षणासाठी नियामक आराखड्यात अनेक प्रवेश आणि निर्गम बिंदूंसाठी समान धोरण.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले की, नवीन शैक्षणिक धोरण-2020 मध्ये शैक्षणिक पतपेढीची तरतूद, शैक्षणिक प्रणालीत वाढती गुंतवणूक, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, वंचित प्रदेशांसाठी विशेष शैक्षणिक झोन, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे 12 वी पर्यंत अद्यतन आणि लोक विद्येवर लक्ष केंद्रीत करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे याचा समावेश आहे. 

अमित शाह पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ चा उद्देश समग्र आणि बहुशाखीय पद्धतीने भारतीय शिक्षण पद्धतीत अमुलाग्र परिवर्तन घडवून आणणे आणि देशातील बालकांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे.

 

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642195) Visitor Counter : 158