रसायन आणि खते मंत्रालय

पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी अमोनियम सल्फेटचे एकूण 20 कंटेनर हल्दिया बंदरात पाठविले जाणार

Posted On: 29 JUL 2020 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत असलेल्या फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी), या सार्वजनिक क्षेत्र उद्यमाने वाहतुकीसाठी पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील जहाज वाहतुकीचा वापर सुरु केला आहे.

 560 मेट्रीक टन अमोनिअम सल्फेट घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या पहिल्या ताफ्याला एफएसीटी उद्योगमंडल कॉम्प्लेक्स, एलूर येथे काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी अमोनिअम सल्फेटची 20 कंटेनर हल्दीया बंदराकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एसएसएल विशाखापट्टणम हे जहाज 560 मेट्रीक टन अमोनिअम सल्फेटसह 30 जुलै रोजी कोची बंदराहून निघण्याची शक्यता आहे. 

याकामी एफएसीटीला कोची पोर्ट ट्रस्टचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.जहाजामधून पाठवण्यात आलेले खत निश्चित जागी पोहचवण्यासाठी पुढे रेल्वेचा वापर केला जाणार आहे.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642119) Visitor Counter : 174