PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 29 JUL 2020 7:11PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 29 जुलै 2020

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला आज मंजुरी देण्यात आली. शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे. 21 व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून 34 वर्ष जुन्या1986 च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी, निःपक्षपात,दर्जा, परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभांवर याची उभारणी करण्यात आली आहे.  2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र, बहू शाखीय, 21 व्या शतकाच्या गरजाना अनुरूप करत भारताचे चैतन्यशील प्रज्ञावंत समाज आणि जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून परिवर्तन घडवण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळ्या क्षमता पुढे आणण्याचा या धोरणाचा उद्देश आहे

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

  • केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्याचाचणी, मागोवा, उपचार (टेस्ट, ट्रॅक, ट्रीट) या धोरणाच्या समन्वयीत अंमलबजावणीमुळे प्रती रुग्ण मृत्यूदर (सीएफआर) जागतिक पातळीच्या तुलनेत प्रभावीपणे कमी करण्यावर भर दिला आहे, हा दर वेगाने घसरत आहे.

सध्या  मृत्यूदर 2.23% आहे, जो 1 एप्रिल 2020 पासून सर्वात कमी आहे.

केवळ  मृत्यूदर कमी झाला असे नाही, तर प्रभावी नियंत्रण धोरण, जास्तीत जास्त चाचण्या आणि एकूण देखभालीसाठी प्रमाणित क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमुळे सलग सहाव्या दिवशी प्रतिदिन 30,000 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या जलदगतीने 10 लाखांच्या जवळ जात आहे. गेल्या 24 तासांत 35,286 रुग्णांना सुट्टी दिल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,88,029 एवढी झाली आहे. कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याच्या दरात वाढ होऊन आता तो 64.51% एवढा झाला आहे.

इतर अपडेट्स

महाराष्ट्र अपडेट्स :

मुंबईत सेरो-सर्वेक्षण करण्यात आले, यात झोपडपट्टी परिसरातील 57% नागरिकांमध्ये सार्स-सीओव्ही2 विरोधात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, तर निवासी सोसायट्यांमध्ये हे प्रमाण 16% आहे. राहण्यास अपुऱ्या जागेमुळे योग्य शारिरीक अंतर ठेवण्यात येणाऱी अडचण, सार्वजनिक शौचालयांचा वापर हे संक्रमणाचा उच्च प्रसार होण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. मुंबईत मंगळवारी 8,000 चाचण्या होऊन नव्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येत घट होऊन ती 717 एवढी झाली. जुलैच्या सुरुवातीला 5,000-6,000 चाचण्यांमागे 1,500 रुग्णांची नोंद होत होती. यातून आर्थिक राजधानीतील कोविड-19 संक्रमणाचा प्रसार हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येते. मंगळवारी महाराष्ट्र राज्यात 7,717 रुग्णांची नोंद झाली. सक्रीय रुग्णांची संख्या 1,44,696 एवढी आहे.  

 

***

G.C/S.T/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642107) Visitor Counter : 238