आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकत्रित चाचण्या 1.77 कोटींच्या पुढे


प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून ती आता 12858

Posted On: 29 JUL 2020 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या वाढवून, तातडीने संपर्क ओळखून कोविड-19 रुग्णांचे अलगीकरण करण्यात येत आहे.

गेल्या 24 तासांत 4,08,855 नमुना चाचण्या करण्यात आल्या, यामुळे प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून आता 12,858 झाली आहे आणि एकूण चाचण्यांची संख्या 1.77 कोटींच्या पुढे गेली आहे.  

देशातील 1316 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे.सध्या 906 सरकारी प्रयोगशाळा आणि 410 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये खालील प्रयोगशाळा समाविष्ट आहेत :

  • रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 675 :  (शासकीय : 411 + खासगी : 264)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 537 (शासकीय :  465 + खासगी : 72)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 104: (शासकीय : 30 + खासगी 74)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 संक्रमण आणि भारतात तंबाखूचा वापर हे प्रकाशन प्रस्तुत  केले आहे. ते https://www.mohfw.gov.in/pdf/COVID19PandemicandTobaccoUseinIndia.pdf या संकेतस्थळावर पाहता येईल.

कोविड 19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in.

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642094) Visitor Counter : 237