आदिवासी विकास मंत्रालय
TRIFED कडून आदिवासी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्वंकष डिजिटायझेशन मोहीम
आदिवासींच्या 1 लाखांहून जास्त वस्तू TRIFED ने खरेदी केल्या; त्याऑनलाईन माध्यमातून सवलतीत विक्रीची योजना
Posted On:
28 JUL 2020 12:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2020
जीवनातील प्रत्येक गोष्ट ऑनलाइन होत असतानाच आदिवासी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील TRIFED ने फक्त आदिवासी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘सर्वंकष डिजिटायझेशन मोहीम’सुरू केली आहे.
या मोहिमेद्वारे ग्रामीण भागातील आदिवासी उत्पादक आणि कलाकारांना राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या हेतूने त्यांना अत्याधुनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांचे स्थान अधोरेखित करणे अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले आहेत.
आदिवासी अर्थव्यवस्थेला परिणामकारकतेने आगेकूच करता यावी, हा यामागील उद्देश आहे. वनधन योजना, ग्रामीण आठवडी बाजार आणि त्यांची कोठारे याच्याशी संबंधित असलेल्या वन रहिवाशांशी संबंधित माहितीचेडिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सध्या TRIFED करत आहे.
डिजिटायझेशनच्या या प्रक्रियेमुळे सर्व आदिवासी समूहांना ओळख मिळेल तसेच जीआयएस तंत्रज्ञानाने त्यांचे स्थान निश्चित होईल. यामुळे या सर्वांना ‘आत्मनिर्भर अभियान’ या पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या मोहिमेअंतर्गत आणणे शक्य होईल.
ह्या संकटकालीन परिस्थितीत ‘गो ग्लोबल फॉर लोकल’ हा मंत्र स्वीकारत त्याला ‘गो व्होकल फॉर लोकल गो ट्रायबल - मेरा वन मेरा धन मेरा उद्यम’यामध्ये रुपांतरीत करण्यासाठी TRIFEDने त्यांच्या नेहमीच्या मान्यताप्राप्त कार्यक्रमांसोबतच अनेक वेगळ्या वाटेवरचे निर्णय राबवलेआहेत. सध्याच्या कठीण काळात त्रासलेल्या आदिवासींसाठी ते रामबाणही ठरत आहे.
महामारी आणि लॉकडाऊन यामुळे आदिवासी कलाकारांचा जवळपास शंभर कोटी रुपये मूल्यांच्या वस्तूंचा साठा विक्रीशिवाय पडून राहिला होता. हा साठा विकला जावा तसेच त्यातून मिळणारे उत्पन्न या परिस्थितीच्या फेऱ्यात सापडलेल्या आदिवासी कुटुंबांना मिळावे म्हणून TRIFED ने एक लाखाहून जास्त वस्तू खरेदी केल्या आणि हा विक्री न होऊ शकलेला मालप्राईज इंडिया हे संकेतस्थळ तसंच इतर प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ ॲमेझॉन,फ्लिपकार्ट व GeM च्या माध्यमातून (मोठ्या सवलती देत) रिटेल विक्रिचीही योजना आखत आहे.
आता जीव आणि जीवन जगवण्याचे साधन या दोहोंमध्ये लोकांचा संघर्ष सुरू आहे. अशावेळी TRIFED योद्धे आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे मोठ्या उत्साहाने वाटचाल करत आहेत.
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641984)
Visitor Counter : 163