आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

संसद सदस्यांमध्ये  जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक हेपेटायटीस दिनानिमित्त डॉ. हर्षवर्धन दुसऱ्या एम्पथी ई-कॉन्क्लेवमध्ये सहभागी

Posted On: 28 JUL 2020 2:55AM by PIB Mumbai

 

जागतिक हेपेटायटीस दिनानिमित्त दुसरी एम्पथी ई-परिषद आयोजित करण्यात आली. याला लोकसभा सभापती ओम बिरला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर  केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद (डिजिटली सहभाग) उपस्थित होते.  केंद्रिय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी  सन्माननिय अतिथीपद भुषवले.   यकृत आणि पित्तशास्त्र संस्थेने (ILBS) भारतीय विमानतळ प्रधिकरणाच्या सहयोगाने संसद सदस्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला.

परिषदेचे उद्धाटन करताना ओम बिरला म्हणाले, “ सलग दुसऱ्या वर्षी जागतिक हेपेटायटीस दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात माझा सहभागा आहे याचा मला आनंद होत आहे.” परिषदेला उपस्थित असलेल्यांचे स्वागत करताना हर्षवर्धन म्हणाले, “यावर्षीच्या परिषदेचा विषय आहे  ‘आपले यकृत कोविड कालखंडात सुरक्षित राखणे‘ .  ही गोष्ट सुसंगत, महत्वपूर्ण आणि परिक्षा घेणाऱ्या या कालखंडासाठी आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली संकटपूर्व आणि ते रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे आपल्याला कोविड-19 महामारी संसर्ग आटोक्यात राखायला मदत झाली.

सार्वत्रिक जाणीव आणि समूह स्थलांतर यावर प्रकाश टाकताना हर्षवर्धन म्हणाले “ हेपेटायटीस हा जागतिक स्तरावरचा प्रश्न बनला आहे. हेपेटायटीस-बी आणि सी हे चोरपावलानी येणारे महामारीसदृश आजार आहेत.  इथे उपस्थित असलेल्या माझ्या  सर्व सहकाऱ्यांना मी यासंबधी  समाजजागृती करण्याचे तसेच यासंबधीची भिती दूर करण्यासाठी दूत म्हणून जबाबदारी निभावण्याचे आवाहन करत आहे.

कोविड-19 महामारीशी लढा देताना गेल्या चार महिन्यांपासून SARS-Cov-2 नमुने तपासणीसाठी डॉ एस के सरीन तसेच यकृत आणि पित्तशास्त्र संस्थेची (ILBS) संपूर्ण टीम घेत असलेल्या अथक कष्टांबद्दल  हर्षवर्धन यांनी त्यांचे आभार मानले.

डॉ पूनम खेत्रपाल, विभागीय संचालक , SEARO (WHO), विजय कुमार देव, मुख्य सचीव दिल्ली, अरविंद सिंग अध्यक्ष ( भारतीय़ विमानतळ प्राधिकरण) आणि इतर संसद सदस्य तसेच श्रोतृवर्ग हे या कार्यक्रमात डिजीटली सहभागी झाले होते.

****

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641782) Visitor Counter : 220