राष्ट्रपती कार्यालय

कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपतींची लष्करी रुग्णालयाला (आर्थिक) मदत


कोरोना योद्‌ध्यासाठी एअर फिल्टरिंग उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार निधी

Posted On: 26 JUL 2020 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2020

कारगिल युद्धामध्ये शौर्याने लढलेल्या आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून, भारताचे राष्ट्रपती, राम नाथ कोविंद यांनी आज (26 जुलै 2020) 20 लाख रुपयांचा धनादेश दिल्लीतील लष्करी रुग्णालयाला (संशोधन आणि संदर्भ) प्रदान केला. कोविड -19 या साथीच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे वापरता येईल असे वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. आज कारगील युद्ध विजयाचा 21 वा वर्धापनदिन आहे, जो विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

सैनिकी रुग्णालयासाठी राष्ट्रपतींनी दिलेले योगदान हे राष्ट्रपती भवनाच्या आर्थिक खर्चाच्या कपातीमुळे शक्य झाले आहे आणि यामुळे कोविड -19 विषयक साहित्य उपलब्ध होण्यासाठी स्त्रोत निर्माण झाले आहेत. राष्ट्रपतींनी अलिकडेच राष्ट्रपती भवनात अनेक उपाय योजना करून खर्च कमी करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार, या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी यापूर्वी औपचारिक प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या लिमोझिन गाडीच्या खरेदीचा प्रस्ताव पुढे ढकलला होता.

लष्कर रुग्णालयात राष्ट्रपतींकडून दिलेल्या योगदानाचा वापर PAPR च्या (पॉवर्ड एअर प्युरिफाइंग रेस्पिरेटर) युनिटसाठी वापरला जाईल, जे उपकरण वैद्यकीय व्यावसायिक शस्त्रक्रियेदरम्यान श्वास घेण्यासाठी वापरतात. त्यांना संसर्गापासून वाचविण्यासाठी सक्षम करण्यास असलेले अत्याधुनिक उपकरण आहे. हे अदृश्य शत्रूशी लढा देणाऱ्या योद्ध्यांचे संरक्षण करेल आणि त्याद्वारे रुग्णांची काळजी घेता येईल.

सशस्त्र सैन्याचे सर्वोच्च कमांडर म्हणून या भूमिकेत, राष्ट्रपतींचे योगदान सैनिकी रुग्णालयाच्या अग्रभागी असणाऱ्या कोविड योद्ध्यांचे मनोबल वाढवेल. त्यांना सुरक्षित, पोषक वातावरण प्रदान करण्यात त्याची दीर्घकालीन मदत होईल, जेणेकरून ते त्यांच्या क्षमतांचे उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतील. अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे की ही भूमिका अन्य लोकांना आणि संस्थांना खर्चाच्या कपातीसाठी प्रेरणा देईल आणि आमच्या कोविड योद्ध्यांना मदत आणि पाठिंबा देण्यासाठी बचतीचा उपयोग होईल

सैनिकी रुग्णालय (संशोधन आणि संदर्भ) हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च वैद्यकीय सेवा केंद्र आहे. कमांडंट मेजर जनरल शरद चंद्र दास हे देखील ऑपरेशन विजयमध्ये  सहभागी होते ज्यासाठी त्यांना युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत याचे चिकित्सक, परिचारिका तसेच अर्ध चिकित्सकीय कर्मचारी (प्रयोगशालेय कर्मचारी) अथक 24 तास कार्य करीत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून सर्वोच्च गुणवत्तेची आरोग्य चिकित्सा उपलब्ध करून देत आहेत.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641417) Visitor Counter : 211