आदिवासी विकास मंत्रालय

ट्रायफेडने उन्नत भारत मोहिमेसाठी (यूबीए) आयआयटी, दिल्लीबरोबर सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षऱ्या


आदिवासींना उपजीविकेसाठी सक्षम बनविण्याकरिता 2600 पेक्षा अधिक संस्था ट्रायफेडसह एकत्र आल्या

Posted On: 25 JUL 2020 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2020

आदिवासींच्या हितासाठी आणि विकासासाठी वचनबद्ध असलेल्या संघटनांपैकी एक म्हणून आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ट्रायफेड आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नात अग्रभागी राहिले आहे. सातत्याने पुढाकार घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणी व्यतिरिक्त, ट्रायफेडने आता भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम उन्नत भारत मोहिमेसाठी (यूबीए) आयआयटी दिल्लीबरोबर भागीदारी केली आहे.

या भागीदारीची औपचारिकता करण्यासाठी आणि याचा पाया घट्ट रोवण्यासाठी आयआयटी दिल्ली येथे काल ट्रायफेड, आयआयटी दिल्ली (यूबीएच्या वतीने राष्ट्रीय समन्वयक संस्था म्हणून) आणि विज्ञान भारती (विभा, एक स्वदेशी विज्ञान चळवळ) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ट्रायफेडच्या वन धन कार्यक्रमांतर्गत आदिवासी उद्योजक आता उन्नत भारत मोहिमेअंतर्गत (यूबीए) 2600 पेक्षा अधिक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या जाळ्यातील तज्ज्ञांपर्यंत प्रवेश करू शकतील.

आयआयटी दिल्ली सोबत, उन्नत भारत मोहीमेसाठी (यूबीए) ``राष्ट्रीय समन्वयक संस्था`` (एनसीआय), ट्रायफेडने संबंधित मंत्रालय, जिल्हा प्रशासन, स्थानिक पंचायत राज संस्था (पीआरआय), स्वयंसेवी संस्था, इतर भागधारक तसेच इतर भाग घेणाऱ्या संस्थांशी  सहकार्य करून आदिवासींच्या उपजीविकेच्या आणि उत्पन्नाच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याची कल्पना आखण्यात आली आहे. विशेषतः ही भागीदारी वन धन योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या वन धन विकास केंद्राच्या माध्यमातून उपजीविका वाढविण्यास मदत करू शकते.

आयआयटी दिल्ली आणि उन्नत भारत मोहीम यांच्यातील भागीदारीमुळे, गौण वन उत्पादनांमध्ये गुंतलेल्या या जंगलात राहणाऱ्या आदिवासींना उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य, मार्गदर्शक, परिवर्तनशील डिजिटल कार्यपद्धती, खात्रीशीर मार्गदर्शनाचा आधार यांची माहिती मिळेल. हा सामंजस्य करार देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिवंतांसाठी एक मार्ग खुला करून देत आहे, जेणेकरून आदिवासींच्या उपजीविकेच्या शाश्वत समस्यांना सामोरे जाताना त्या समस्यांचे निराकरण करण्यात सहभागी होऊ शकतात.

आयआयटी दिल्ली – ट्रायफेड भागीदारीला विज्ञान भारतीच्या (विभा) कौशल्य आणि अनुभवांचा फायदा होईल, ही  स्वदेशीच्या प्रेरणेने केलेली विज्ञान चळवळ आहे, ज्याचा उद्देश भारतात वेगवेगळ्या प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण विकास हा आहे, आणि ज्याचा वास्तवाशी संबंध निर्माण करणे आणि विज्ञान तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने काम करणे, हा आहे.

विभा हे स्थानिक शाखांमधून वन धन योजना (व्हीडीवाय) मजबूत करण्याच्या उद्देशाने लक्ष केंद्रित करून अभिसरण करण्यासाठी विविध भागधारकांकडे नियोजन स्थापित करेल. ट्रायफेड, यूबीए आणि आदिवासी जमातींसाठी गरजा आणि संभाव्य हस्तक्षेपाबद्दल महत्त्वाची माहिती एकत्रित करण्यात आणि पाठविण्यात विभा सहकार्य करेल. वन धन योजनेत गुंतलेले आदिवासी लाभार्थी, Tech4Seva, सूचना ईआरपी पोर्टल (सीएसआयआर – यूबीए – विभा) यांचाही लाभ मिळवू शकतील.

वन धन विकास केंद्रे ही आदिवासी जमाती आणि वनवासी आणि आदिवासी कारागीर यांना रोजगार निर्मितीचे स्त्रोत म्हणून उदयास आली. 22 राज्यातील 3.6 लाख आदिवासी जमातींना 18000 बचत गटामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 18500 स्वयंसहायता गटांमधील 1205 आदिवासी उपक्रमांची स्थापना केली गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विकासाला मिळालेली गती थांबू नये याचा विचार करून ट्रायफेडने आणखी  वन धन केंद्र मंजूर करून त्यांची संख्या 3000 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्नत भारत अभियान (यूबीए) हे मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी), भारत सरकारचा एक प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम आहे, ज्यात समावेशक भारताच्या स्थापत्यास मदत करण्यासाठी ज्ञान संस्थांचा फायदा करून घेऊन ग्रामीण विकास प्रक्रियेतील एक परिवर्तनशील बदलाची कल्पना करण्यात आली आहे.

https://unnatbharatabhiyan.gov.in/index#network.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641346) Visitor Counter : 355