ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

PMGKAY-2 अंतर्गत आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून 19.32 मेट्रिक टन अन्नधान्याची उचल


आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मे महिन्यात 2.40 कोटी तर जून महिन्यात 2.47 कोटी लाभार्थ्यांना 2,43,092 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 11,678 चणाडाळही वितरीत

Posted On: 22 JUL 2020 8:52PM by PIB Mumbai

 

एकूण धान्यसाठा :

भारतीय अन्न महामंडळाच्या 21 जुलै 2020 च्या अहवालानुसार, सध्या महामंडळाकडे 253.28 लाख मेट्रिक टन तांदूळ आणि 531.05 लाख मेट्रिक टन गहू आहे. म्हणजेच एकूण 784.33 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उपलब्ध आहे. (यात सध्या खरेदी सुरु असलेल्या गहू आणि तांदळाचा समावेश नाही) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांअंतर्गत वितरणासाठी दर महिन्याला 95 लाख मेट्रिक टन धान्याची आवश्यकता असते.

लॉकडाऊनपासून 139.97 लाख मेट्रिक टन धान्याची उचल घेण्यात आली असून 4999 मालवाहू डब्यातून हे धान्य पाठवण्यात आले आहे. तसेच 30 जून 2020 पर्यंत, 285.07 लाख मेट्रिक टन अन्नधान्य पाठवण्यात आले. 1 जुलै 2020 पासून 26.69 लाख मेट्रिक टन धान्याची उचल घेण्यात आली असून 953 मालवाहू डब्यातून हे धान्य पाठवण्यात आले आहे. रेल्वेमार्गाव्यतिरिक्त, रस्ते आणि जलमार्गाद्वारे अन्नधान्य वाहतूक केली जात आहे. 1 जुलै 2020 पासून एकूण 50.91 लाख मेट्रिक टन अन्नधान्य पाठवण्यात आले, तर ईशान्य भारतात  1.63 लाख मेट्रिक टन अन्नधान्य पाठवण्यात आले.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना-

अन्न धान्य ( तांदूळ/गहू)

या योजनेअंतर्गत आतापर्यंत  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी एप्रिल, मे, जून 2020 या महिन्यांसाठी 117.08 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची उचल घेतली आहे.

एप्रिल महिन्यात, 37.43 लाख मेट्रिक टन (94 %) अन्नधान्य 74.86 कोटी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. तर मे महिन्यात, एकूण  37.41 लाख मेट्रिक टन (94%) अन्नधान्य 74.82 कोटी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. जून महिन्यात, 36.19 लाख मेट्रिक टन (91%)  अन्नधान्य 72.38 कोटी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.गेल्या तीन महिन्याततील सरासरी वितरण 93 टक्के इतके आहे.

 

डाळी

या तीन महिन्यांसाठी एकूण 5.87 लाख मेट्रिक टन डाळींची गरज होती, त्यापैकी, आतापर्यंत 5.83 लाख मेट्रिक टन डाळी  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आले असून त्यापैकी 5.79 लाख मेट्रिक टन डाळी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचल्या आहेत. तर, 4.89 LMT लाख मेट्रिक टन डाळी वितरीत करण्यात आल्या आहेत.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना -2:

 

अन्न धान्य (तांदूळ/गहू) :

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा दुसरा टप्पा एक जुलैपासून सुरु झाला असून तो  नोव्हेंबर 2020 पर्यंत सुरु राहणार आहे. PMGKAY योजनेअंतर्गत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जुलै ते नोव्हेंबर या काळात अन्नसुरक्षा योजनेच्या सर्व 81 कोटी लाभार्थ्यांना 201 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरीत केले जाणार आहे.

PMGKAY-2 योजनेअंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 201.1 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरीत करण्यात आले असून, पुढच्या पाच महिन्यांसाठी हे धान्य मोफत वितरीत केले जाणार आहे.

यात 91.14 लाख मेट्रिक टन गहू आणि  109.94 लाख मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे.  विविध  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून आतापर्यंत 19.32 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची उचल घेण्यात आली आहे.  या योजनेसाठी 76,062 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च केंद्र सरकार वहन करणार आहे. गहू चार राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आणि  तांदूळ 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरीत करण्यात आला आहे. तर इतर 17 राज्यांना दोन्ही, म्हणजे गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.

 

डाळी

या पाच महिन्यांसाठी एकूण 12 लाख मेट्रिक टन डाळींची गरज आहे. या सर्व डाळींचा खर्च 6849 कोटी रुपये, केंद्र सरकार वहन करणार आहे. 15 जुलै पर्यंत विविध डाळींचा एकूण 10.38 लाख मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. सुमारे 22.52 लाख मेट्रिक टन चणाडाळ PSS साठ्यात तर 1.30 लाख मेट्रिक टन चणाडाळ PSF साठ्याअंतर्गत उपलब्ध आहे.

 

स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटप (आत्मनिर्भर भारत पॅकेज)

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत, केंद्र सरकार सुमारे 8 लाख स्थलांतरित, अडकलेल्या मजुरांना आणि गरीब कुटुंबांना दरमहा/प्रतिव्यक्ती 5 किलो गहू/तांदूळ आणि प्रती कुटुंब 1 किलो चणाडाळ मोफत दिली जात आहे.ज्या व्यक्ती आणि कुटुंबे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने किंवा शिधापत्रिका योजनेचे लाभार्थी नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे.  मे आणि जून महिन्यात या योजनेअंतर्गत अन्नधान्य वाटप करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 6.39  लाख मेट्रिक टन अन्नधान्याची उचल घेतली. 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी  त्यापैकी 2,43,092  मेट्रिक टन अन्नधान्य (मे  महिन्यात 2.40 कोटी लाभार्थ्यांना आणि जून महिन्यात 2.47 कोटी) लाभार्थ्यांना  वितरीत केले.

केंद्र सरकारने 39,000  मेट्रिक टन चणा, 1.96  कोटी स्थलांतरीत कुटुंबाना देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यापैकी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 33,745 मेट्रिक टन चणाडाळ पाठवण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आतापर्यंत  32,968 मेट्रिक टन चणाडाळ उचलली असून त्यापैकी  11,678 मेट्रिक टन वितरीत करण्यात आली आहे.

या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत असून या योजनेअंतर्गत अन्नधान्य खरेदीसाठी सुमारे 3,109 कोटी तर चणाखरेदीसाठी 280 कोटी रुपये निधी अपेक्षित आहे.

 

अन्नधान्य खरेदी :

21 जुलै 2020, पर्यंत, एकूण 389.74 लाख मेट्रिक टन गहू आणि 751.10 लाख मेट्रिक टन तांदूळ  खरेदी करण्यात आले.

 

एक देश एक शिधापत्रिका :

एक जूनपर्यंत, केंद्र सरकारची एक देश-एक शिधापत्रिका योजना महाराष्ट्रासह, 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राबवण्यात आली आहे.  31 मार्च 2021 पर्यंत सर्व उर्वरित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश केला जाणार असून सर्व राज्यात ही योजना राबवली जाईल.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640495) Visitor Counter : 231