श्रम आणि रोजगार मंत्रालय
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांक- जून 2020
Posted On:
20 JUL 2020 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2020
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठी जून 2020 या महिन्यात अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांकांत( बेसः 1986-87=100) एका अंकाची घट झाली असून ते अनुक्रमे 1018( एक हजार अठरा) आणि 1024( एक हजार चोवीस) झाले आहेत. शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांच्या निर्देशांकात घट होण्यामागे प्रामुख्याने अन्नधान्य हा घटक कारणीभूत असून या दोहोंसाठी ही घट अनुक्रमे (-) 1.82 अंक आणि (-) 1.58 अंक आहे. तांदूळ, तूर डाळ, मसुर डाळ,शेंगदाणा तेल, मांस, बकरी, कुक्कुट उत्पादने, भाज्या आणि फळे इत्यादींच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम या दोन निर्देशांकांवर झाला आहे. निर्देशांकातील चढ/ उतार यामध्ये राज्याराज्यांमध्ये फरक आहे. शेतमजुरांच्या निर्देशांकांत तामिळनाडू राज्य 1214 अंकांनी अग्रस्थानी आहे तर 784 अंकांसह हिमाचल प्रदेश यादीच्या सर्वात तळाशी आहे.
ग्रामीण मजुरांच्या निर्देशांकाच्या यादीत तामिळनाडू 1199 अंकांसह अव्वल स्थानावर असून 832 अंकांसह हिमाचल प्रदेश तळाशी आहे.
राज्यांमध्ये शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या ग्राहक निर्देशांकात ओडिशा राज्यात मुख्यत्वे बकरीचे मांस, ताजे/ सुके मासे, भाज्या आणि फळे आणि सुती साड्या( यंत्रनिर्मित) यांच्या दरातील वाढीमुळे सर्वाधिक( अनुक्रमे 7 आणि 8 अंक) वाढीची नोंद झाली. तर जम्मू आणि काश्मीर राज्यात फळे आणि भाजीपाला यांच्या दरात घट झाल्यामुळे शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या ग्राहक दर निर्देशांकात( अनुक्रमे 19 आणि 20 अंक) सर्वाधिक अंकांची घट झाली.
जून 2020 मध्ये शेतमजूर ग्राहक दर निर्देशांक आणि ग्रामीण मजूर ग्राहक दर निर्देशांक यांच्यावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात जून 2020 मध्ये अनुक्रमे 8.40 टक्क्यांवरून 7.16 ट्क्के आणि 8.12 टक्क्यांवरून 7.00 टक्के घट झाली. शेतमजूर ग्राहक दर निर्देशांक आणि ग्रामीण मजूर ग्राहक दर निर्देशांकाच्या अन्न निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचे दर जून 2020 मध्ये अनुक्रमे (+) 8.57% आणि 8.41% इतके राहिले.
M.Iyengar/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639951)
Visitor Counter : 251