आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण (एनएचपी) यासाठी माता मृत्यू दर नियंत्रणात ठेवण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारताची वाटचाल: डॉ हर्ष वर्धन
Posted On:
17 JUL 2020 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2020
माता मृत्यू दर नियंत्रणात भारताने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी माहिती दिली, की 'रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया'ने जाहीर केलेल्या माता मृत्यू दर याविषयीच्या विशेष वार्तापत्रानुसार भारतात वर्षभरात माता मृत्यू दरात 9 अंकांची घट झाली आहे. 2015-17 मध्ये हे प्रमाण 122 होते, जे 2016-18 मध्ये (7.4 % कमी होऊन) 113 झाले; 2011-2013 या कालावधीत माता मृत्यूचे प्रमाण 167 होते, जे सातत्याने कमी होत 2014-2016 दरम्यान 130 झाले, तर 2015-17 मध्ये 122 आणि 2016-18 या काळात 113 इतके खाली आले.
शाश्वत विकास ध्येयांबाबत भारताच्या कटिबद्धतेवर बोलताना डॉ हर्षवर्धन म्हणाले, “माता मृत्यू दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे भारत 2030 पर्यंत बाळंतपणावेळी माता जीवित राहण्याचे प्रति लाख 70 हे शाश्वत विकास उद्दिष्ट आणि 2020 पर्यंत बाळंतपणावेळी माता जीवित राहण्याचे 100 टक्के राष्ट्रीय आरोग्य धोरणाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट लक्ष्य गाठलेल्या राज्यांची संख्या आता 3 वरून 5 झाली आहे. उदा. केरळ (43), महाराष्ट्र (46) इत्यादी
डॉ हर्ष वर्धन यांनी राजस्थान (ज्याने सर्वात कमी 22 अंकांची घसरण नोंदविली), उत्तर प्रदेश (19 अंक), ओदिशा (18अंक), बिहार (16 अंक) आणि मध्य प्रदेश (15 अंक) या राज्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, दोन राज्यांनी (तेलंगणा आणि महाराष्ट्र) माता मृत्यू दरात 15 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदविली. तर ओदिशा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांनी 10-15% घसरण नोंदविली.
केंद्र सरकार आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी घेतलेल्या प्रयत्नांची माहिती देताना डॉ हर्ष वर्धन म्हणाले, “या यशाचे श्रेय संस्थांत्मक प्रसूतीमध्ये प्रभावी कामगिरी, तसेच सेवांच्या गुणवत्तेवर आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, तसेच लक्ष्य आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यासारख्या नवीन योजनांद्वारे सरकारच्या अथक प्रयत्नांना देता येईल.”
S.Pophale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639526)