कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सार्वजनिक प्रशासन 2020 च्या उत्कृष्टता पंतप्रधान पुरस्कारासाठी सुधारित योजना आणि वेब पोर्टल www.pmawards.gov.in.चे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते लोकार्पण
Posted On:
17 JUL 2020 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2020
ईशान्य प्रदेश विकास केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री , डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार आणि www.pmawards.gov.in.या वेब पोर्टलचे लोकार्पण केले. या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळ व राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांना संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारात लोकसहभाग घेण्याच्या शासनाच्या प्रारूपाच्या अनुषंगाने या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. ते म्हणाले की, “जास्तीत जास्त कारभार, किमान शासन” हा मंत्र नागरिकांच्या सहभागाशिवाय आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तसेच पारदर्शकता आणि जबाबदारी ही त्याची दुहेरी ओळख आहे.

परिणाम निर्देशक, आर्थिक विकास, लोकसहभाग आणि जनतेच्या तक्रारींचे निवारण या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार या योजनेत नव्याने सुधारणा करण्यात आली. जिल्हा कामगिरी निर्देशक कार्यक्रम, नवोन्मेष सर्वसाधारण श्रेणी, महत्वाकांक्षी जिल्हे कार्यक्रम आणि नमामि गंगे कार्यक्रम या चार प्रमुख विभागांमध्ये नामांकन मागविण्यात आले आहे. जिल्हा कामगिरी निर्देशक कार्यक्रमांतर्गत समावेशक विकासासाठी अग्रक्रम क्षेत्रात पतपुरवठा, जन भागीदारी - स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) आणि स्वच्छ भारत अभियान (शहरी) कार्यक्रमांच्या प्राथमिकता योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सेवा वितरण आणि सार्वजनिक तक्रारींचे निराकरण याअनुषंगाने जिल्हाधिका्यांचे मूल्यांकन केले जाईल. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील नवकल्पनांसाठी स्वतंत्र पुरस्कार श्रेणी देण्यासाठी या योजनेची व्याप्ती आहे. पुरस्कार निवडीसाठी 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 हा कालावधी विचारात घेण्यात येईल. 2020 योजनेत एकूण 15 पुरस्कार देण्यात येतील.

17 जुलैपासून 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वेगवेगळ्या श्रेणी अंतर्गत जिल्हे / अंमलबजावणी करणारे घटक / संस्था यांच्याकडून www.pmawards.gov.in.या संकेतस्थळाद्वारे त्यांनी केलेल्या चाकोरी बाहेरच्या नवोन्मेषावर प्रकाश टाकणारे ठराविक नमुन्यानुसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील. एक सुलभ नोंदणी प्रक्रिया सक्षम करण्यासाठी आणि पंतप्रधान पुरस्कार 2020 साठी मोठ्या प्रमाणात सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी विभाग हितधारकांना अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकाद्वारे संबोधित करेल.
B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639446)
Visitor Counter : 242