अर्थ मंत्रालय

राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत खासगी क्षेत्राच्या 1.03 लाख सदस्यांची भर

Posted On: 17 JUL 2020 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2020

भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस)’ ने  2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठीची आपली सदस्य संख्या प्रसिद्ध केली आहे. या योजनेच्या सदस्‍य संख्येत  30% वाढ नोंदवली गेली आहे. एनपीएसमध्ये खासगी क्षेत्राच्या 1.03 लाख व्यक्तिगत सदस्यांची नोंदणी पहिल्या तिमाहीत करण्यात आली. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 206 कॉरपोरेट नोंदणीही करण्यात आली आहे.  त्यामुळे 18 ते 65 वर्ष वयोगटातले एकूण 10.13 लाख कॉरपोरेट सदस्‍य झाले आहेत. नोंदणीकृत 1,02,975 सदस्यांपैकी 43,000 जणांनी आपल्या नियोक्ताच्या माध्यमातून  सदस्यता प्राप्त केली आहे. बाकी सदस्यांनी स्वेच्छेने या योजनेत आपली नोंदणी केली आहे.

कोविड-19 नंतर नियोक्त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वित्तीय सुस्थितीसाठी त्यांना पुरेसे सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी अधिक प्रभावशाली उपाय स्वीकारले आहेत किंवा त्यासाठी तयारी दर्शवली आहे.

काही कंपन्या स्वतंत्र आणि निःपक्ष वित्तीय सल्ला प्रदान करत सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. याशिवाय सुमारे 30 टक्के नियोक्ता आर्थिक स्थिति आणि नोकरीच्या सुरक्षितते संबंधित मानसिक ताण आणि चिंता यांच्या दृष्टीकोनातून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि भावनात्‍मक स्थितिवर महामारीमुळे होत असलेले प्रतिकूल परिणाम कमी करण्यावर विचार करत आहेत.

निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) चे   अध्यक्ष सुप्रतिम बंदोपाध्याय यांनी म्हटले आहे, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) कॉरपोरेट कर्मचाऱ्यात मोठी यशस्वी ठरली आहे. तसे पाहिल्यास लोकांच्या जीवनात बरेचदा वित्तीय नियोजनाला  प्राथमिकता नसते मात्र  या महामारीमुळे लोकांनी  वित्तीय नियोजनावर विचार  मंथन सुरू केले आहे, यामुळे संकटाच्या या काळात वित्तीय सुरक्षाक्षेबाबत जागरूकता वाढत आहे. एनपीएसच्या लाभाबाबत कर्मचाऱ्याना जागरूक करण्यात खाजगी कंपन्यांनी बजावलेली भूमिका प्रशंसनीय आहे असे त्यांनी म्हटले आहे. अनपेक्षित संकटाच्या या काळात ग्राहकांना  विना अडथळा सेवा पुरवण्यासाठी आपणही विविध पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पेन्शन प्रणालीविषयी नागरिकांमध्ये जागृती व्हावी आणि जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी पीएफआरडीए फिक्कीसोबत वेबिनार आयोजित करत आहे.

 

S.Thakur/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639430) Visitor Counter : 145