पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजने अंतर्गत गुजरातमधल्या सोमनाथ इथे तीर्थक्षेत्र सुविधा विकास प्रकल्पाच्या उद्‌घाटनाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंह पटेल यांची आभासी पद्धतीने उपस्थिती

Posted On: 16 JUL 2020 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जुलै 2020

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंह पटेल, आज गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासमवेत पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजने अंतर्गत ‘गुजरातमधल्या सोमनाथ तीर्थक्षेत्र सुविधा विकास प्रकल्पाच्या’ उद्‌घाटनाला आभासी पद्धतीने उपस्थित राहिले. ‘गुजरात, सोमनाथ इथे तीर्थक्षेत्र विकास सुविधा’ प्रकल्पाला 'प्रसाद' योजने अंतर्गत मार्च 2017 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. 45.36 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आला. वाहनतळ सुविधा, पर्यटन सुविधा केंद्र, घन कचरा व्यवस्थापन अशा जागतिक तोडीच्या सुविधा या प्रकल्पाअंतर्गत विकसित करण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या निधीचा सर्वोत्तम वापर केल्याबद्दल पटेल यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. राज्य सरकारला पर्यटन क्षेत्रात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून  सर्व सहकार्य आणि सहाय्य पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पर्यटन मंत्रालयाने 2014-15 मध्ये विवक्षित तीर्थस्थळ आणि वारसा स्थळांच्या एकात्मिक विकासाच्या उद्देशाने तीर्थस्थळ पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा वृद्धी अभियान (प्रसाद) राष्ट्रीय मिशन सुरु केले. प्रवेश स्थाने (रस्ता, रेल्वे, जल वाहतूक), तळागाळपर्यंत संपर्क जाळे, माहिती, अनुवाद यासारख्या मूलभूत सुविधा, एटीएम, मनी एक्सचेंज, पर्यावरण स्नेही वाहतूक साधने, क्षेत्रात प्रकाश आणि नविकरणीय उर्जा स्त्रोताद्वारे प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, क्लोक रूम, प्रतीक्षा गृह, प्रथमोपचार केंद्र, क्राफ्ट बाजार, हाट, सोविनियर दुकाने, उपहारगृहे, वर्षा आश्रयस्थान, दूरसंवाद सुविधा, इंटरनेट जोडणी इत्यादी पायाभूत विकास करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 

 

S.Pophale/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639299) Visitor Counter : 165