रेल्वे मंत्रालय
रेल्वेने महसूलवृध्दी, खर्च कपात, कार्यसुरक्षेला प्राधान्य आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे हित याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता -रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2020 10:42PM by PIB Mumbai
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने आज ऑनलाईन वर्कमेन संगोष्टी आयोजित करण्यात आली,या परिषदेत भारतभरातील रेल्वे कर्मचारी युनियन्सचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पीयुष गोयल,रेल्वे राज्यमंत्री श्री. सुरेश सी.अंगडी आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष श्री. व्ही.के.यादव यांच्यासह रेल्वे मंडळातील अनेक वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या परिषदेला संबोधित करताना श्री. पीयुष गोयल यांनी टाळेबंदीच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी अविश्रांतपणे बजाविलेल्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “वरीष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आणि कर्मचारी या प्रत्येकाने ,प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले.महामारीमुळे रेल्वे सध्या कठिण परिस्थितीचा सामना करत आहे. या महामारीमुळे जगभरात उभ्या राहिलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी फेडरेशनच्या नेत्यांनी गंभीरपणे विचार करावा” असे श्री. गोयल म्हणाले.
रेल्वेचा महसूल कसा वाढेल,खर्चात कपात कशी करता येईल, मालवाहतूकीचा सहभाग कसा वाढविता येईल आणि रेल्वेची गतिमानता आणि विस्तार कसा होऊ शकेल याविषयीच्या वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांवर फेडरेशनने विचार करावा,असे श्री. गोयल यांनी सांगितले. सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि कल्याणाबाबत ही विचार करावा, गोयल यांनी सुचविले. या काळात रेल्वे अधिकाऱ्यांनी, युनियन्सनी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन कार्य करण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी, रेल्वेच्या नफ्यात वाढ करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांचे सुसुत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याची इच्छा गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. रेल्वे कर्मचारी त्यांच्या संस्थांवर जीव टाकतात. त्यांच्याकडे रेल्वेचा नफा वाढवण्यासाठी कल्पना असतील .महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना अशा कल्पना लढविण्यास सक्रीयपणे मदत करून त्या मंत्रालयाकडे पाठव्यावात,असे ते यावेळी म्हणाले.
परिषदेला संबोधित करताना रेल्वे राज्यमंत्री श्री. सुरेश सी.अंगडी म्हणाले, गेल्या 167 वर्षांत कधीही न थांबलेली रेल्वे या महामारीने थांबवली. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी याकाळात न कंटाळता काम केले. योध्द्याप्रमाणे काम करणाऱ्या भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. भविष्यातही रेल्वे कर्मचारी असेच कष्ट करतील आणि भारतीय रेल्वे जगातील उत्तम रेल्वे होईल, अशी आशा त्यांनी प्रकट केली.
*****
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1639218)
आगंतुक पटल : 274