आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रॅपिड अँटिजेन टेस्टसह 1234 लॅबमुळे प्रति दशलक्ष चाचण्या 9231 पेक्षा जास्त 24 तासात 3.26 लाखापेक्षा अधिक नमुन्यांची चाचणी

Posted On: 16 JUL 2020 5:41PM by PIB Mumbai

 

``चाचणी, शोध, उपचार (टेस्ट, ट्रेस, ट्रीट)`` या रणनितीनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाचण्यांसाठी केंद्र सरकार पुढाकार घेत आहे. मिळालेल्या परिणामानुसार, देशभरात चाचणी प्रयोगशाळांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढलेली चाचणी आयसीएमआर मार्गदर्शक तत्वांनुसार आहे आणि त्यामुळे रुग्ण शोधण्यास लवकर मदत झाली आहे.

कोविड – 19 च्या चाचणीमधील आरटी – पीसीआर या महत्त्वाच्या मानकांसह चाचण्या केल्या जात आहेत. अर्ध्या तासाच्या आत निकाल देणारी’ रॅपिड अँटिजेन पॉइंट ऑफ केअर’ चाचणीचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे . यामुळे रुग्णसंख्येचा प्रभाव अधिक असलेल्या आणि बाधित क्षेत्रात चाचणीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे संसर्ग पसविण्यात प्रभावीपणे मदत होऊ शकली आहे.

आता नोंदणीकृत सर्व वैद्यकीय प्रॅक्टिशनर्सना चाचणीची परवानगी देण्यात आली असूनआरटी – पीसीआर, ट्रू नॅट आणि सीबीएनएएटी यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोठ्याप्रमाणावर चाचण्या करणे शक्य झाले आहे.

गेल्या 24 तासात 3,26,826  नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. एकूण 1,27,39,490 नमुन्यांची चाचणी केली गेली तर प्रति दशलक्ष 9231.5 चाचण्या भारतात करण्यात आल्या.

देशात 1234 लॅब मुळे चाचणी प्रयोगशाळांची क्षमता आता वाढली आहे, 874 प्रयोगशाळा सरकारी क्षेत्रात आणि 360 खासगी प्रयोगशाळा आहेत. यांचाही समावेश आहे :

आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 635 (सरकारी 392 + खासगी 243)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 499 (सरकारी 447 + खासगी 52)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 100 (सरकारी 35 + खासगी 65)

कोविड – 19 संदर्भात कोणतीही अधिकृत  आणि ताजी आकडेवारी /माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघावयाच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www/mojfw.gov.in  आणि @MoHFW_INDIA.  तांत्रिक बाबींच्या माहितीसाठी technicalquery.covid17[at]gov[dot]in  यावर मेल पाठवू शकता आणि अन्य माहितीसाठी Ncov2019[at]gov[dot]in  @CovidIndiaSeva  या वर संपर्क साधता येईल.

कोविड – 19 संदर्भात काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : +91-11-23978046  या हेल्पलाइनवर किंवा 1075 या टोल फ्री क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronavariushelplinenumber.pdf   या वर उपलब्ध आहे.

***

B. Gokhale/ S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639164) Visitor Counter : 141