पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 17 जुलै 2020 रोजी इकोसॉकच्या उच्च-स्तरीय विभागाला संबोधित करणार

Posted On: 16 JUL 2020 1:05PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 17 जुलै 2020 रोजी न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या या वर्षीच्या उच्च-स्तरीय विभागाला सकाळी 9.30 ते 11.30 (स्थानिक वेळ) या वेळात आभासी माध्यमातून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नॉर्वेचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह समारोप सत्राला देखील संबोधित करणार आहेत.

वार्षिक उच्च-स्तरीय विभागामध्ये सरकार, खाजगी क्षेत्र, नागरी संस्था आणि शैक्षणिक संस्थांकडून उच्चस्तरीय प्रतिनिधींचे विविध गट सहभागी झाले आहेत. या वर्षाच्या उच्च-स्तरीय सत्राची संकल्पना आहे "कोविड-19 नंतर बहुपक्षीयवाद : 75 व्या वर्धापनदिनी आम्हाला कोणत्या प्रकारचे संयुक्त राष्ट्र आवश्यक आहे".

बदलते आंतरराष्ट्रीय वातावरण आणि कोविड-19 साथीच्या आजारानुसार आयोजित केलेले हे सत्र बहुपक्षीयतेला आकार देणाऱ्या महत्वपूर्ण शक्तींवर लक्ष केंद्रित करून मजबूत नेतृत्वाच्या माध्यमातून जागतिक अजेंड्याला पाठबळ देण्यासाठी मार्ग शोधणे, प्रभावी आंतरराष्ट्रीय संस्था, भागीदारीचे विस्तृतीकरण जागतिक सार्वजनिक वस्तूंचे महत्व वर्धित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

2021-22 या कालावधीसाठी 17 जून रोजी सुरक्षा मंडळाच्या अस्थायी सदस्य म्हणून भारताने केलेल्या जबरदस्त निवडणुकीनंतर, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापक सभासदांना संबोधित करण्याची पंतप्रधानांची ही पहिली संधी असेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त इकोसॉकच्या उच्च-स्तरीय विभागाची संकल्पना देखील भारतीय सुरक्षा परिषदेच्या प्राधान्याने दिसून येते, ज्यात आम्ही कोविड-19 नंतरच्या जगात 'बहुपक्षीय सुधारणा' करण्याचे आवाहन केले आहे. ईकोसॉकचे उद्घाटन अध्यक्ष म्हणून भारताच्या भूमिकेची (1946 मधील सर रामास्वामी मुदालियार) पुनरावृत्ती आहे. पंतप्रधानांनी यापूर्वी जानेवारी 2016 मध्ये इकोसॉकच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य भाषण दिले होते.

***

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639015) Visitor Counter : 269