पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केदारनाथ धाम येथील विकास कामांचा घेतला आढावा

Posted On: 15 JUL 2020 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथ धाममध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आणि धामचे देवत्व वृद्धिंगत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

आढावा घेताना केदारनाथ मंदिर आणि जगद्गुरू आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे देवत्व वृद्धिंगत करण्यासाठी आणि परिसरात स्वच्छता व विकास सुनिश्चित करण्यावर विचार-विनिमय करण्यात आला. गौरीकुंड-केदारनाथ मार्गावर प्रवाशांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व दर्शविण्याची व्यवस्था करण्यात यावी, यावर देखील आढावा बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.

* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638908) Visitor Counter : 152