आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 आजारामधून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 5.3 लाखांपेक्षा जास्त; सक्रिय रूग्णांची संख्या 2.9 लाख
बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रूग्णांपेक्षा 2.4 लाखांनी जास्त
गेल्या 24 तासांमध्ये 19,000 पेक्षा जास्त लोक बरे झाले
कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण प्रति दक्षलक्ष 8396.4
Posted On:
12 JUL 2020 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2020
कोविड-19 ची लक्षणे दिसू लागताच जर वेळेवर निदान झाले आणि संबंधित रूग्णावर तातडीने उपचार केले तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, हे लक्षात घेवून सरकारने याच दृष्टिकोनातून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड-19 बरोबर लढा देण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. चाचणी आणि त्वरित निदान करणे यांच्यामध्ये समन्वय साधून पावले उचलली जात असल्यामुळे रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 चे एकूण 19,235 रूग्ण बरे झाले. याचा परिणाम म्हणजे कोविड-19 च्या बरे झालेल्या रूग्णांच्या एकत्रित आकडेवारीमध्ये वाढ झाली आहे. देशामध्ये आत्तापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या आज 5,34,620 झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी आता 62.93 झाली आहे.
कोविडचे रूग्ण बरे व्हावेत, यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रूग्णांपेक्षा 2,42,362 ने जास्त आहे. तर कोरोनामुळे आजारी असलेल्या 2,92,258 सक्रिय रूग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय सेवा दिली जात आहे.
कोविडबाधित व्यक्तींना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी कोविड समर्पित आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण 1370 कोविड समर्पित रूग्णालये (डीसीएच), 3062 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आणि 10334 कोविड दक्षता केंद्र (सीसीसी) यांचा समावेश आहे.
या कोविड समर्पित वैद्यकीय केंद्राना सुयोग्य पद्धतीने कार्य करता यावे, यासाठी केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत 122.36 लाख पीपीई संच, 223.33 एन95 मास्क, आणि 21,685 व्हेंटिलेटर्सची उपलब्धता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करून देण्यात आली आहे.
कोविड-19ची चाचणी करण्यामध्ये येणारे सर्व अडथळे आता सरकारने दूर केले आहेत. तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचणी करण्यासाठी व्यापक सुविधा देण्यात आली आहे. राज्यांना सर्वत्र कोविड-19 चाचणी करणे शक्य व्हावे यासाठी ही प्रक्रिया आता सक्षम करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये नेमक्या किती चाचणी केल्या जातात, यांच्या आकडेवारीत नियमित वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2,80,151 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आत्तापर्यंत देशात झालेल्या चाचण्यांचा एकत्रित आकडा पाहिला तर देशात 1,15,87,153 चाचण्या झाल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजेच भारतामध्ये प्रति दक्षलक्ष 8396.4 या प्रमाणात जनतेच्या कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
कोविडच्या चाचणी संख्येमध्ये निरंतर वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरलेला महत्वाचा घटक म्हणजे, संपूर्ण देशामध्ये तपासणी आणि निदान प्रयोगशाळांचे जाळे विस्तारित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सकारी क्षेत्रामध्ये 850 प्रयोगशाळा आणि खासगी क्षेत्रातल्या 344 प्रयोगशाळा म्हणजेच दोन्ही मिळून 1194 प्रयोगशाळांमधून कोविड-19 ची चाचणी, परीक्षण केले जात आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.
- रिअल टाइम, जलद - आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 624 (सरकारी -388 अधिक खासगी 236)
- ट्रूनॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 472 (सरकारी -427 अधिक खासगी 45)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 98 (सरकारी - 35 अधिक खासगी 63).
कोविड-19 विषयीच्या सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे तसेच सल्ला यासाठी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला नियमित भेट द्या.: https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
कोविड-19 विषयीच्या तांत्रिक प्रश्नांची, शंकाची उत्तरे हवी असतील तर पुढील ई-मेलवर विचारणा करावी. technicalquery.covid19[at]gov[dot]in
इतर शंकाविषयी ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva.
कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर उपलब्ध आहे.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638170)
Visitor Counter : 208
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam