आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या कोविड -19 रुग्णांसाठी इटोलिझुमबला प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने दिली मंजुरी
Posted On:
11 JUL 2020 2:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2020
इटोलिझूमब (आरडीएनए मूळ), एक मोनोक्लोनल अँटीबॉडी असून गंभीर प्लेक सोरायसिससवरील उपचारासाठी यापूर्वी त्यास मंजुरी दिली होती, त्याला आता क्लिनिकल चाचण्यांच्या आकडेवारीच्या आधारे भारतीय औषध महानियंत्रकानी (डीसीजीआय) प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.
अल्झुमॅब या ब्रँड नावाखाली 2013 पासून मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या प्लेक सोरायसिस असलेल्या रूग्णाच्या उपचारासाठी मेसर्स बायोकॉन या औषधाची निर्मिती आणि विपणन करत आहे. हे देशी औषध आता कोविड -19 साठी पुन्हा वापरण्यात येणार आहे.
मेसर्स बायोकॉनने कोविड -19 रूग्णांवर दुसऱ्या टप्प्यात केलेल्या क्लिनिकल चाचणीचे निष्कर्ष डीसीजीआयकडे सादर केले आहेत. डीसीजीआयच्या कार्यालयात विषय तज्ज्ञ समितीमध्ये या चाचण्यांच्या निष्कर्षांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
मृत्यूचा प्राथमिक एंडपॉइंट , फुफ्फुसाचे कार्य उदा. पिएओ 2 आणि ओ 2 (PaO2 and O2) सॅच्युरेशनमध्ये सुधारणा आदी तपशील सादर करण्यात आला. आयएल -6, टीएनएफ α इत्यादी प्रमुख इनफ्लॅमेटरी मार्कर आदी सादर करण्यात आले. कोविड -19 रूग्णांमध्ये अति-जळजळ रोखण्यात हे औषध उपयुक्त ठरल्याचे आढळले.
सविस्तर चर्चा आणि समितीच्या शिफारशी विचारात घेतल्यानंतर, मध्यम ते गंभीर तीव्र श्वसनाचा त्रास असलेल्या कोविड -19 बाधित रूग्णांमधील सिटोकिन रिलीज सिन्ड्रोम (CRS) च्या उपचारासाठी डीसीजीआयने प्रतिबंधित आपत्कालीन वापराअंतर्गत औषध विपणनाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रूग्णांची संमती, जोखीम व्यवस्थापन योजना, केवळ रुग्णालयात वापर यांसारख्या अटींचे पालन अनिवार्य असेल.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड आयडी -19 साठी क्लिनिकल व्यवस्थापन नियमावलीमध्ये सूचित केलेल्या “इन्व्हेस्टिगेशनल थेरपी” चा भाग असलेल्या औषधांपेक्षा इटोलिझूमब या देशी औषधासह उपचाराचा सरासरी खर्च देखील कमी आहे.
U.Ujgare/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637949)
Visitor Counter : 366
Read this release in:
Punjabi
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam