गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आशियातील सर्वात मोठ्या 750 मेगावॅट रिवा सौर ऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित केल्याबद्दल पंतप्रधानांचे मानले आभार


या महत्वपूर्ण भविष्यकालीन प्रकल्पाने मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या दूरदृष्टीचे मजबूतीकरण - अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, की रिवा सौर ऊर्जा प्रकल्पामुळे 2022 पर्यंत भारताच्या नियोजित 175 गिगावॅट स्थापित नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य पूर्ण करणे साध्य होईल.

Posted On: 10 JUL 2020 7:38PM by PIB Mumbai

 

आशियातील सर्वात मोठा ,750 MW चा रिवा सौर ऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले, की या महत्वपूर्ण भविष्यकालीन प्रकल्पाने मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दूरदृष्टीचे मजबूतीकरण केले आहे. 2022 पर्यंत भारताचे 175 गिगावॅट (GW) स्थापित नूतनीकरणक्षम ऊर्जेचे लक्ष्य पूर्ण करणे रिवा सौर ऊर्जा प्रकल्पामुळे साध्य होईल, असेही ते म्हणाले.

अर्पित केलेला 750 मेगावॅटचा रिवा सौर ऊर्जा प्रकल्प, भविष्यात देशाला ऊर्जा सुरक्षिततेत ,आत्मनिर्भर बनविण्यासाठीचे, पुढचे पाऊल ठरेल. 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरीसमध्ये झालेल्या एकविसाव्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परीषदेत (COP-21) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केली होती.

I thank PM @NarendraModi for dedicating Asia's largest '750 MW Rewa Solar Project' to the nation. This key futuristic project reinforces Modi govt's vision of #AatmaNirbharBharat & its commitment towards achieving the target of 175 GW installed renewable energy capacity by 2022. pic.twitter.com/WVGWhWH0fl

— Amit Shah (@AmitShah) July 10, 2020

*****

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1637825) Visitor Counter : 99