आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने सुधारणा, दर 61.53 %
सक्रीय रुग्णांपेक्षा कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 2 लाखांहून अधिक
गेल्या 24 तासात 2.6 लाखाहून अधिक नमुन्यांची तपासणी
Posted On:
08 JUL 2020 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2020
कोविड-19 साठी नमुन्यांची तपासणी करण्याच्या संख्येत दर दिवशी भरीव वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2,62,679 नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 53,000 नमुने खाजगी प्रयोगशाळात तपासण्यात आले. आतापर्यंत 1,04,73,771 नमुने तपासण्यात आले. परिणामी एक दशलक्ष लोकसंख्ये मागे 7180 चाचण्या सध्या होत आहेत. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने तपासणी, शोध आणि उपचार या त्रिसूत्री धोरणाचा अवलंब केल्याने हे शक्य झाले आहे.
कोविड-19 चाचणी संख्येतली प्रशंसनीय वाढ होण्यातला महत्वाचा घटक म्हणजे देशभरात निदान करणाऱ्या प्रयोगशाळांच्या संख्येत झालेली वाढ. सरकारी क्षेत्रात 795 प्रयोगशाळा तर खाजगी 324 प्रयोगशाळा मिळून देशात 1119 प्रयोगशाळा आहेत.
- यामध्ये समावेश आहे
- - रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 600 (सरकारी: 372 + खाजगी: 228 )
- TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 426 (सरकारी: 390 + खाजगी: 36 )
- CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 93 (सरकारी: 33 + खाजगी:60 )
आयसीयू आणि ऑक्सिजन सुविधा युक्त खाटा, व्हेंटीलेटर आणि इतर साधने यासह वाढत्या आरोग्य पायाभूत विविध प्रकारच्या कोविड सुविधा यामुळे कोविड-19 बाधितांचे वेळेवर निदान आणि प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन सुनिश्चित झाले आहे. कोविड-19 रुग्ण अधिक संख्येने बरे होत असल्यामुळे कोविड मधून बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यामधले अंतर 1,91,886 झाले आहे.
गेल्या 24 तासात 16,883 रुग्ण कोविड मधून बरे झाले आहेत, यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता 4,56,830 झाली आहे.
कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून हा दर आज 61.53% झाला.
सध्या 2,64,944 सक्रीय रुग्ण असून हे सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे,आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर मुद्दे ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर उपलब्ध आहे.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637317)