संरक्षण मंत्रालय
अविवाहित दिव्यांग मुले वयाच्या 25 वर्षानंतरही माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेच्या (ईसीएचएस) सुविधेसाठी पात्र
Posted On:
08 JUL 2020 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2020
आतापर्यंत अविवाहित, कायमस्वरुपी अपंग आणि आर्थिकदृष्ट्या परावलंबी तसेच ज्यांच्या वयाची २५ वर्षे पूर्ण झाली अशा सैनिक मुलांना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेचे (ईसीएचएस) लाभार्थी मानले जात नव्हते तसेच त्यांना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस) अंतर्गत वैद्यकीय सुविधा मिळण्यास पात्र समजण्यात येत नव्हते. परंतु हे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) नियमांनुसार असून, ज्याचे पालन ईसीएसएस द्वारे केले जाते. तथापि, सीजीएचएसने कार्यालय पत्रक (ओएम) क्रमांक 4-24 / 96-सी आणि पी / सीजीएचएस (पी) / ईएचएस दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी जारी केल्यानुसार सीजीएचएस लाभार्थ्यांचे पुत्र ज्यांना वयाच्या 25 वर्षानंतर दिव्यांगत्व आले आहे, आणि त्यांच्यावर अवलंबून आहेत म्हणूनच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 5 मे 2018 रोजी जारी केलेल्या कार्यालय पत्रक क्रमांक 4-24 / 96-सी आणि पी / सीजीएचएस (पी) / ईएचएस मधील अटींची पूर्तता केल्यानंतर सीजीएचएस योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
आता संरक्षण मंत्रालय आणि माजी सैनिक कल्याण विभागाने निर्णय घेतला आहे की, उपरोक्त पात्रतेप्रमाणेच ईसीएचएस लाभार्थ्यांचे अविवाहित पुत्र जे वयाची 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी दिव्यांग झाले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या ईसीएचएस लाभार्थ्यांवर अवलंबून आहेत आणि म्हणूनच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 7 मे 2018 रोजी जारी केलेल्या कार्यालय पत्रकातील अटींची पूर्तता केल्यानंतर सीजीएचएस योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637216)
Visitor Counter : 245