गृह मंत्रालय

स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामीजींना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली केली अर्पण


‘‘स्वामी विवेकानंद एक राष्ट्रभक्त संत, महान विचारवंत आणि असामान्य- अनुकरणीय वक्ते होते; त्यांनी केवळ भारतामध्ये राष्ट्रवादाची भावना रूजवली असे नाही तर संपूर्ण विश्वामध्ये भारतीय समृद्ध संस्कृतीच्या गुणविशेष जतनाचे कार्य केले’’ - अमित शहा

शिक्षण, वैश्विक बंधुभाव आणि आत्म-प्रबोधन या विषयीचे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक असल्याचे अमित शहा यांनी सांगितले

केंद्रीय गृह मंत्री म्हणाले, ‘‘ स्वामी विवेकानंदांचा भारतीय युवकांमध्ये असलेल्या उंदड क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या मते युवापिढीच आगामी काळामध्ये राष्ट्राच्या विकासाला योग्य दिशा दाखवेल आणि सक्षम बनवेल’’

‘‘आजच्या काळातही स्वामी विवेकानंदांची तत्वे आणि त्यांचा आदर्श तरुणांना राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देतात. आज पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना नमन करतो ’’: अमित शहा

Posted On: 04 JUL 2020 10:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या व्टिटर संदेशात अमित शहा यांनी म्हटले आहे की, ‘‘स्वामी विवेकानंद एक राष्ट्रभक्त संत, महान विचारवंत आणि अनुकरणीय- असामान्य वक्ते होते; त्यांनी केवळ भारतामध्ये राष्ट्रवादाची भावना रूजवली असे नाही तर संपूर्ण विश्वामध्ये भारतीय समृद्ध संस्कृतीच्या गुणविशेष जतनाचे कार्य केले. शिक्षण, वैश्विक बंधुभाव आणि आत्म-प्रबोधन या विषयीचे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत.’’

केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की, ‘‘ स्वामी विवेकानंदांचा भारतीय युवकांमध्ये असलेल्या उंदड क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या मते युवापिढीच आगामी काळामध्ये राष्ट्राच्या विकासाला योग्य दिशा दाखवेल आणि सक्षम बनवेल’’. अमित शहा यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे की, ‘‘आजच्या काळातही स्वामी विवेकानंदांची तत्वे आणि त्यांचा आदर्श तरुणांना राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देतात. आज पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना नमन करतो’’.

 

M.Jaitly/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636574) Visitor Counter : 168