सांस्कृतिक मंत्रालय

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाची सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके 6 जुलै 2020 पासून होणार खुली: प्रल्हाद सिंह पटेल


प्रार्थनास्थळे असलेली एएसआयची 820 केंद्रीय संरक्षित स्मारके 8 जून 2020 पासूनच सुरु करण्यात आली

Posted On: 03 JUL 2020 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020


संस्कृती मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत 6 जुलै 2020 पासून सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके उघडण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), प्रल्हाद सिंह पटेल यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, केवळ बिगैर-प्रतिबंधित क्षेत्रातील स्मारके/संग्रहालये पर्यटकांसाठी खुली असतील. सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके आणि स्थळांना गृह मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या स्वच्छता, शारीरिक अंतर आणि इतर आरोग्य मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. राज्य आणि / किंवा जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही विशिष्ट आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ही स्मारके बंद करण्यात आली होती. एकूण 3691 केंद्रीय संरक्षित स्मारके एएसआय अंतर्गत येतात, त्यापैकी प्रार्थनास्थळे असलेली एएसआयची 820 केंद्रीय संरक्षित स्मारके 8 जून 2020 पासूनच सुरु करण्यात आली आहेत 

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या एसओपी साठी लिंकवर क्लिक करा, सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके आणि संग्रहालये उघडण्यासाठी, खालीलप्रमाणे आहेत:

पर्यटकांसाठीच्या सूचनांसाठी लिंकवर क्लिक करा

 

* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636204) Visitor Counter : 218