रसायन आणि खते मंत्रालय

30 जून 2020 या एकाच दिवशी खतांचे 73 रेक्स पोहचविण्याचा विक्रम


गौडा यांनी खते विभागाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केले अभिनंदन तर रेल्वेचीही केली प्रशंसा

Posted On: 02 JUL 2020 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी आज खते विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले; तसेच 30 जून 2020 या एकाच दिवशी 73 खतांचे (रेक्स) पोहचविण्यास मदत केली म्हणून, रेल्वे मंत्रालयाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. एकाच दिवसात एवढे खतांचे रेक्स पोहचविणे हा आतापर्यंतचा  एक विक्रमच आहे, असे गौडा यावेळी म्हणाले.

यावर्षी जून महिन्यात साधारणतः दरदिवशी 56.5 रेक्स पोहचविली जात होती. पण हा ऐतिहासिक विक्रमी आकडा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांना, परवडणाऱ्या दरात वेळेवर खतांचा पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या खरीपाच्या हंगामासाठी, देशभरातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खतांचा स्थिर पुरवठा केला जाईल, यासाठी केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्याची काळजी घेतली जाईल.

 

S.Pophale/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635946) Visitor Counter : 210