विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

समाजासाठी भू विज्ञान यावर भू संशोधन विद्वानांची एनजीआरएसएम मधे चर्चा

Posted On: 29 JUN 2020 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जून 2020

चौथ्या राष्ट्रीय भू संशोधन तज्ञ बैठक, एनजीआरएसएममधे भू संशोधक विद्वानांनी नैसर्गिक संसाधने, जल व्यवस्थापन,भूकंप, मोसमी पाऊस,हवामान बदल,नैसर्गिक आपत्ती,नद्या यंत्रणा यासारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करत, समाजासाठी भू विज्ञान यावर वेबिनारच्या माध्यमातून चर्चा केली. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या डेहरादूनच्या वाडिया इंस्टिट्युट ऑफ हिमालयीन जीओलॉजी,डब्ल्यूआयएचजीया स्वायत्त संस्थेने ही बैठक आयोजित केली होती.

 विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रा आशुतोष शर्मा यांनी भू संशोधनाच्या जल स्त्रोतांचा शोध, अभियांत्रिकी क्षेत्रात भू विज्ञान, पिक आणि पाणी या दृष्टीने हवामान बदलाचा अभ्यास, शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा उपयोग, कृषी आणि शाश्वत विकास यामध्ये सौर उर्जेचा वापर यासारखे  पैलू  उद्‌घाटनपर भाषणात विषद केले.

गेल्या आठवड्यात झालेल्या या दोन दिवसीय वेबिनारमधे देशभरातले 20 नामांकित वक्त्यांचे विचार मांडले गेले.

 प्रतिभावान युवकांनी समाजाच्या हितासाठी संशोधन करावे यासाठी वाडिया इंस्टिट्युटऑफ हिमालयीन जीओलॉजीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रा.अशोक सहानी यांनी प्रेरित केले. डब्ल्यूआयएचजीचे संचालक डॉ कालाचंद सैन आणि संस्थेच्या जेष्ठ वैज्ञानिकांनी,भू विज्ञान संशोधनाचे सामाजिक महत्व तसेच सध्याचे कल याविषयी सादरीकरण केले.

युवा संशोधक आणि विद्यार्थ्यांची संशोधनात रुची वाढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे संशोधन सादर करण्यासाठी मंच उपलब्ध व्हावा, समकक्षाकडून त्यांना प्रतिसाद मिळावा, त्यांच्या कल्पनांना अधिक उत्तम रूप मिळावे यासाठी 2016 मधे वाडिया इंस्टिट्युटऑफ हिमालयीन जीओलॉजीचा नियमित कार्यक्रम म्हणून एनजीआरएसएम सुरु झाली. यामुळे भू विज्ञान संशोधनातले प्रचलित प्रवाह जाणून घेण्याची आणि प्रख्यात भू वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी त्यांना उपलब्ध होते.

कोविड-19 मुळे यावर्षी चौथी एनजीआरएसएम वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आली होती.अशा प्रकारे आयोजित केलेली डब्ल्यूआयएचजीची ही पहिली बैठक होती. देशातली 82 विविध विद्यापीठे,संस्था यामधले 657 विद्वान यामध्ये सहभागी झाले.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635148) Visitor Counter : 203