सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
संकटग्रस्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम, उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला मदत करण्यासाठी निधी योजनेला मंत्रालयाची मंजुरी
ही योजना दोन लाख एमएसएमईनां 20,000 कोटी रुपयांची हमी प्रदान करणार
एनपीए (अक्रियाशील मालमत्ता) जाहीर झालेल्या किंवा संकटग्रस्त परंतु कार्यान्वित एमएसएमईच्या प्रवर्तकांसाठी ही गौण-कर्जाची सुविधा उपलब्ध
Posted On:
24 JUN 2020 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2020
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना गौण कर्ज (सीजीएसएसडी) पत हमी योजना सुरु केली; या योजनेला “एमएसएमईसाठी संकटग्रस्त मालमत्ता निधी-गौण कर्ज” देखील संबोधले आहे.
या योजनेनुसार, संकटग्रस्त एमएसएमई मध्ये भागभांडवल म्हणून अधिक गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या प्रवर्तकांना 20,000 कोटी रुपयांची हमी प्रदान केली जाईल.
कर्ज किंवा समभागांच्या स्वरुपात भांडवल मिळविणे हे संकटग्रस्त एमएसएमई समोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे लक्षात आले आहे. म्हणूनच, आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून, 13 मे 2020 रोजी, अर्थमंत्र्यांनी, कार्यान्वित असलेल्या परंतु संकटग्रस्त एमएसएमईच्या प्रवर्तकांसाठी ही गौण कर्जाची योजना जाहीर केली होती. सीसीईएच्या मान्यतेसह आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आणि वित्त मंत्रालय, एसआयडीबीआय आणि आरबीआय यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर गडकरी यांनी आज नागपूर येथे औपचारिकरित्या ही योजना सुरू केली.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
· 30 एप्रिल 2020 रोजी एनपीए घोषित झाल्या आहेत अशा संकटग्रस्त परंतु कार्यान्वित एमएसएमई च्या प्रवर्तकांना ही योजना आर्थिक पाठबळ पुरवेल.
- एमएसएमई च्या प्रवर्तकांना त्याच्या हिस्याच्या (समभाग आणि कर्ज) 15 टक्के किंवा 75 लाख रुपये जी रक्कम कमी असेल तितके कर्ज दिले जाईल.
- प्रवर्तक या रक्कमेचा उपयोग एमएसएमई युनिटमध्ये भागभांडवल म्हणून करतील आणि तरलता वृद्धिंगत करून कर्ज-समभाग प्रमाण राखण्याचा प्रयत्न करतील.
- या गौण-कर्जासाठी 90 टक्के हमी या योजनेंतर्गत दिली जाईल आणि 10 टक्के संबंधित प्रवर्तकाकडून घेतली जाईल.
- मूळ रक्कम परत करण्यासाठी 7 वर्षांची मुदतवाढ असेल तर परतफेडीसाठी कमाल कालावधी 10 वर्षाचा असेल.
ही योजना सुमारे 2 लाख एमएसएमईंना आवश्यक ते पाठबळ प्रदान करेल आणि या क्षेत्रात आणि या क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक उपक्रम पुनरुज्जीवित करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या कोट्यावधी लोकांची उपजीविका आणि रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी देखील ही योजना मदत करेल. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी, पात्रतेचे निकष पूर्ण करणारे प्रवर्तक कोणत्याही शेड्यूल वाणिज्य बँकेकडे संपर्क साधू शकतात. एसएसई साठी पत हमी निधी ट्रस्टच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाईल (सीजीटीएमएसई). आवश्यक मार्गदर्शक तत्वांसह संभाव्य सामान्य प्रश्नांची उत्तरे आज जारी करण्यात आली आहेत.
याप्रसंगी, नितीन गडकरी यांनी या योजनेसाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले. मंत्रालयाच्या या अभिनव योजनेला पाठिंबा दिल्याबद्दल व्यय विभाग, वित्तीय सेवा विभाग आणि आरबीआयचे गव्हर्नर यांचेही गडकरी यांनी आभार मानले.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634067)
Visitor Counter : 296