विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 केंद्रस्थानी ठेवून जेएनसीएएसआरकडून संसर्गजन्य आजारांच्या निदानासाठी एका आठवड्याचा अभ्यासक्रम


अभ्यासक्रमातून सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रयोगाधारित प्रशिक्षण मिळणार

सांसर्गिक विषाणू नसलेले कृत्रिम नमुने प्रशिक्षणासाठी वापरणार

Posted On: 24 JUN 2020 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2020

 

जवाहरलाल नेहरू आधुनिक वैज्ञानिक संशोधन केंद्र, (JNCASR) ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखालील स्वायत्त संशोधन संस्था आहे. कोविड-19 महामारीशी दोन हात करत असणाऱ्या आपल्या देशाला सक्षम करण्यासाठीसाठी संस्थेने जाकूर येथे कोविड निदान प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

रिअल टाईम पीसीआर सारख्या अतिसुक्ष्मजीव निदान पद्धती, रोगनिदान तसेच कोविड-19 सारख्या महामारीचा मागोवा घेण्यास उपयुक्त ठरतात. भारतात रिअल टाईम पीसीआर वापरून क्लिनिकल रोगनिदान करणाऱ्या कुशल व्यक्तींची उणीव भासत आहे. देशाची सध्याची आवश्यकता लक्षात घेउन जेएनसीएएसआरने कोविड-19 साठी रिअल टाईम पीसीआर वापरून रोगनिदान करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अत्याधुनिक रोगनिदान प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ केला आहे. प्रत्येकी 6-10 प्रशिक्षणार्थींची एक अशा बॅचेस मधून रिअल टाईम पीसीआर वापरून निदान करणारे उमेदवार तयार करणे हा या प्रशिक्षण-कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे.

साधारण एक आठवड्याच्या कालावधीचा हा अभ्यासक्रम येत्य़ा काही महिन्यात अनेक आणि सतत चालणाऱ्या बॅचेसच्या माध्यमातून प्रशिक्षित लोक तयार व्हावेत या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. पहिल्या बॅचचे प्रशिक्षण 16 ते 22 जून 2020 दरम्यान कोविड प्रशिक्षण केंद्र, जेएनसीएएसआर येथे पार पडले.

साधारण आठवड्याभराच्या या सर्वसमावेशक क्रॅश कोर्समध्ये पुस्तकीय माहिती तसेच प्रयोगशाळा प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना माहिती आणि प्रयोगातून असे दोन्ही प्रकारचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. प्रयोगशाळांमधील प्रशिक्षणात संसर्गयुक्त नमुन्यांवर काम करणे, न्यूक्लिक अ‍ॅसिड संबंधी माहिती आणि प्रतिबंध तसेच रिअल टाईम पीसीआर आणि इतर आण्विक तंत्र, माहिती विश्लेषण आणि सर्वात महत्वाची अशी क्लिनिकल रोगनिदानासंबधीची मानक प्रणाली यांचा समावेश आहे. संसर्गजन्य विषाणू नसलेले फक्त प्रतिकात्मक नमुने या प्रशिक्षणासाठी वापरले जाणार आहेत. प्रशिक्षण घेतलेले उमेदवार कोणत्याही क्लिनिकल रोगनिदान सुविधा केंद्रात भरती होउ शकतील तसेच क्लिनिकल सेटअप मधील नमुने हाताळू शकतील आणि फक्त कोविडच नाही तर इतर संसर्गजन्य आजारांसाठी रिअल टाइम पीसीआर  वापरून रोगनिदान करू शकतील.

“सांसर्गिक नमुने हाताळणे आणि त्यावर काम करणे, रिअल टाइम पीसीआरचा वापर, आण्विक निदान, माहिती विश्लेषण आणि क्लिनिकल रोगनिदानासंबधीची मानक प्रणाली याचे खडतर प्रशिक्षण फक्त कोविड-19 च्या संदर्भातच नाही तर पुढेही सुरू राहून अशा परिस्थितीत देशाला भविष्यातही त्याचा उपयोग होईल ही आम्हाला खात्री आहे.” असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आशुतोष शर्मा म्हणाले.

हा प्रशिक्षण कार्यक्रम वैद्यकिय प्रयोगशाळा परिक्षण (MLT) मध्ये पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नवोदित पदवीधरांसाठी खुला आहे. जे सध्या रुग्णलायांमध्ये काम करत आहेत, त्यांनाही या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्यास आमंत्रित करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्यांना योग्य मानधन आणि निवास–भोजनाची निःशुल्क व्यवस्था संस्थेकडून करण्यात आली आहे.

 

JNCASR JNCASR1

JNCASR2 JNCASR3

* * *

S.Thakur/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1633894) Visitor Counter : 246