कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतातील आघाडीच्या आयुष तज्ज्ञांच्या आभासी बैठकीला संबोधित केले
Posted On:
23 JUN 2020 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2020
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, कोविड महामारीने एकात्मिक वैद्यकीय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पुनरुज्जीवित केली आहेत. ते म्हणाले कि पुढील काळात अधिक प्रभावी वैद्यकीय रोगप्रतिबंध आणि रोग निवारणासाठी यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
विवेकानंद केंद्र बेंगळुरू चे प्रमुख डॉ. नागेंद्र आचार्य, कोचीनच्या त्रिसूर येथील सीताराम आयुर्वेदिक रुग्णालयातील डॉ. रामनाथन, युनानी वैद्यकीय विज्ञान अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे सल्लागार डॉ. जमीर अहमद, होमिओपॅथिक सल्लागार डॉ. अशोक शर्मा, नवी दिल्लीतील मानव व्यवहार आणि संबंधित विज्ञान यांच्यासह आयुषच्या देशभरातील आघाडीच्या तज्ज्ञांच्या आभासी बैठकीला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी आठवण करून दिली की, मधुमेहासारख्या संक्रामक नसलेल्या रोगांच्या बाबतीतही एकात्मिक किंवा समग्र व्यवस्थापनाच्या गरजेची जाणीव झाली असली तरी या बाबींवर म्हणावा तितका भर देण्यात आलेला नाही. ते म्हणाले की, असे सिद्ध करण्यासाठी पुष्कळ पुरावे आणि संशोधन कागदपत्रे आहेत की मधुमेह झालेल्या व्यक्तीला इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण मिळवता येते आणि योग, निसर्गोपचार आदी पर्यायी उपाययोजनांद्वारे औषधाची मात्रा कमी करता येते.

कोविडच्या संदर्भात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की हा एक विषाणूजन्य आजार आहे, कारण रोगनिदान रोग्याच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते आणि म्हणूनच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे महत्त्व लक्षात आले. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी आणि इतर औषधांचा व्यापक वापर केल्यामुळे औषधांच्या पर्यायी प्रणालींमध्ये रस निर्माण झाला आहे.
आभासी मेळाव्यात डॉ. नागेंद्र आचार्य यांनी योगाचे नवीन अभ्यासक्रम सादर केले, जे विशेषत: 60 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांसाठी तसेच 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांसाठी अशा वेगवेगळ्या वर्गांसाठी होते. संपूर्ण योगाभ्यास 15 मिनिटांत केला जाऊ शकतो.

* * *
S.Thakur/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633843)