गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) च्या पार्श्वभूमीवर जीपीआरएच्या (सामान्य पूल निवासी जागा) रहिवासींना सवलत

Posted On: 23 JUN 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2020

गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जीपपीआरएतील रहिवासींना शासकीय निवासस्थान रिकामे करण्यासाठी आणखी 15 दिवसांची म्हणजेच 15 जुलै 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मंत्रालयाने यापूर्वी 5 मे 2020 रोजी सम क्रमांकाच्या नोटीसी द्वारे 30 जून 2020 पर्यंत मुदत वाढ दिली होती. कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे संबंधित रहिवासींना पर्यायी घर भाड्याने मिळण्यात आणि सामानाची ने-आण करण्यासाठी कामगारांची व्यवस्था करण्यात येत असणाऱ्या अडचणींबाबत अनेक निवेदने प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने 22 जून 2020 रोजी जारी केलेल्या नोटीस क्रमांक 12035/2/2020-Pol.II नुसार रहिवासींना 15 जुलै किंवा त्याआधी घर रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे; अन्यथा नुकसान शुल्क/बाजारभावाप्रमाणे भाडे आकारले जाईल.

 

S.Pophale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1633785) Visitor Counter : 250