गृह मंत्रालय
मिझोरमला भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनी वरून संवाद साधून परिस्थितीची घेतली माहिती
अमित शाह यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन
Posted On:
22 JUN 2020 4:39PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्याशी दूरध्वनी वर संवाद साधून राज्यातील भूकंपानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी अमित शहा यांनी प्रार्थना केली. ते म्हणाले, “मी त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.”
झोरमथंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मिझोरमला मदतीचे आश्वासन दिल्याबद्दल आभार मानले.
I have spoken to Shri @ZoramthangaCM ji, Chief Minister of Mizoram, to review the situation after the earthquake tremors in the state. I assured him all possible support from the central government. Praying for everyone’s safety and well-being.
— Amit Shah (@AmitShah) June 22, 2020
****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633328)
Visitor Counter : 211