सांस्कृतिक मंत्रालय
सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय योगदिन 2020 साजरा करण्यासाठी दि. 19 जून ते 21 जून 2020 या कालावधीत “नमस्ते योगा" मोहीम आयोजित करत आहे
या आंतरराष्ट्रीय योग दिनी श्री.प्रल्हाद पटेल यांनी # 10 Million SuryaNamaskar and # Namaste Yoga वापरून त्यांच्यासोबत सूर्यनमस्कार घालण्याचे केले आवाहन
Posted On:
20 JUN 2020 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2020
प्रल्हाद सिंग पटेल,केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री(स्वतंत्र प्रभार) यांनी म्हटले आहे, की येत्या 21जून 2020 रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी ते दिल्लीतील पुराना किल्ला येथे स्वत: सूर्यनमस्कार घालणार असून नागरिकांनी देखील आपापल्या घरात त्यांच्यासोबत सूर्यनमस्कार घालावेत “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वाला योगदिनाची देणगी दिली असून,आपण सर्वांनी आपल्या रोजच्या जीवनात योगा करायला पाहिजे,”असेही पटेल पुढे म्हणाले.
पटेल यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडीओ मेसेज वितरीत केला असून, त्यांनी सर्वांना #10Millions Suryanamaskar & #Namaste Yoga हा व्हिडिओ वापरून आपण करत असलेल्या सूर्यनमस्काराच्या प्रात्यक्षिकाचे व्हिडीओज सामाजिक माध्यमांवर पाठवावेत,जेणेकरून ती एक सामाजिक मोहीम बनेल आणि इतर नागरिकांमध्येही या मोहिमेमुळे आरोग्याबद्दल जागृती निर्माण होईल . या सांस्कृतिक मंत्रीमहोदयांच्या संदेशाला सामाजिक माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद लाभत आहे
येत्या आंतरराष्ट्रीय योगदिनी सुमारे 1कोटी नागरिक पटेल यांच्यासोबत सूर्यनमस्कार घालून या मोहिमेत सामील होती अशी पटेल यांना आशा आहे.
योगा करणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा यासाठी येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने दि.19 ते 21 जून 2020 या कालावधीत "नमस्ते योगा"या मोहिमचे आयोजन केल आहे.
G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632961)
Visitor Counter : 273
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam