युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी अधिक सुधारण्यासाठी क्रीडा मंत्रालय खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करणार: किरेन रिजीजू
यासाठी मंत्रालय पहिल्या टप्प्यात 8 राज्यातील राज्यनिहाय क्रीडा सुविधांचा आढावा घेणार
Posted On:
17 JUN 2020 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2020
‘खेलो इंडिया’ या प्रमुख योजनेअंतर्गत क्रीडा मंत्रालय “खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलन्स (KISCE)” स्थापन करणार आहे. देशभरात खेळांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे केंद्र स्थापन करण्यात येतील. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कर्नाटक, ओदिशा, तेलंगणा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम तसेच नागालँडमध्ये शासकीय मालकीच्या क्रीडा सुविधा केंद्रांना खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलेंसमध्ये अद्ययावत केले जाईल.
क्रीडाक्षेत्रात सुधारणा आणि क्रीडा केंद्रांच्या अधिक सक्षमीकरण करण्याच्या या योजनेची माहिती देताना केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू म्हणाले, “खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सेलन्स ही भारताचे ऑलिम्पिक खेळांतील प्रयत्न आणि कामगिरी अधिक जोमदार होण्यासाठी सुरु केली जाणार आहेत. प्रत्येक राज्यातील उपलब्ध सर्वोत्तम क्रीडा सुविधांचे जागतिक पातळीवरील क्रीडा अकादमींमध्ये रुपांतर करण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न आहे. ज्यामुळे देशभरातून येणाऱ्या क्रीडापटूंना चांगले प्रशिक्षण मिळेल. श्री रिजीजू म्हणाले की, एका शासकीय समितीच्या गहन विश्लेषणानंतर या क्रीडा सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या माध्यातून देशभर प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे त्यांना सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विशेषतः ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकता येईल.
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील क्रीडा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत, क्रीडा सोयीसुविधा, त्या सेवा पुरवणाऱ्या संस्थांची निवड करून त्या केंद्रांचे जागतिक दर्जाच्या केंद्रात रुपांतर करता येईल का हे पाहण्याचे कार्य ऑक्टोबर 2019 पासून सुरू झाले होते. प्राधान्याने खेळल्या जाणाऱ्या खेळांना लागणारी सामुग्री, पायाभूत सुविधा आणि त्या केंद्रातून तयार झालेले विजेते खेळाडू यांचा विचार करून, या योजनेसाठी आलेल्या 15 प्रस्तावांपैकी 8 प्रस्ताव निवडले गेले आहेत.
या केंद्रांचे रुपांतर केआयएसीईमधे करण्यासाठी जो विकासक्षम तफावत निधी सरकार देऊ करेल त्याचा विनियोग केंद्रात खेळले जाणारे विविध क्रीडा प्रकार, क्रीडा विज्ञानक्षेत्र आणि विविध खेळांना लागणाऱ्या तांत्रिक सुधारणा करणे, यासाठी तसेच क्रीडा सामुग्री, तज्ज्ञ प्रशिक्षक, उत्तम कामगिरी करणारे व्यवस्थापक यासाठी देखील करता येईल. ही मदत विशेष करून ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी असली, तरी त्या केंद्रातील क्रीडा विज्ञान आणि त्यासंबंधित इतर क्षेत्रे यासाठी देखील ती उपयोगात आणता येईल.
प्रत्येक राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने, हे केंद्र चालवण्याची आणि त्यात जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा तयार करणे, तसेच आलेल्या खेळाडूंच्या निवास आणि आराम यांच्या व्यवस्थापनासह सर्व बाबींची सोय करण्यासाठी सक्षम होणे आवश्यक असून खेलो इंडिया योजनेतून तज्ज्ञ प्रशिक्षक, इतर सहाय्यक कर्मचारी, साधनसामुग्री, पायाभूत सुविधा यासारख्या महत्वाच्या बाबींसाठी निधी पुरवला जाईल.
जी आठ केंद्रं निवडण्यात आली आहेत, त्यांना सर्वसमावेशक आंतरविश्लेषणाचा अभ्यास करून जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे अनुदान दिले जाईल. मोठ्या स्तरावर खेळांडूचे कौशल्य ओळखून, प्रत्येक राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश, प्रत्येक खेळातील खेळाडूंचे कौशल्य वाढवण्यासाठी या निधीचा वापर करू शकेल. भारतीय क्रीडा प्राधिकरण हे देखील आपले तज्ज्ञ, आपली संसाधने देऊन प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची होईल याकडे लक्ष पुरवेल
पहिल्या टप्प्यात खेलो इंडिया स्टेट सेंटर फॉर एक्सलन्स योजनेतील निवड झालेली केंद्रांची नावे
संगी लाहेन क्रीडा अकादमी, ईटानगर, अरुणाचल प्रदेश
जयप्रकाश नारायण राष्ट्रीय युवा केंद्र, बेंगळुरू, कर्नाटक
जी वी राजा सीनियर सेकेंडरी स्पोर्ट्स स्कूल, तिरुअनंतपुरम, केरळ
खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इंफाळ, मणिपुर
राजीव गांधी स्टेडियम, आइजोल, मिझोराम
स्टेट स्पोर्ट्स अकादमी, आईजी स्टेडियम, कोहिमा, नागालँड
कलिंग स्टेडियम, भुवनेश्वर, ओदिशा
रीजनल स्पोर्ट्स स्कूल, हकीमपेट, तेलंगणा
S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632109)
Visitor Counter : 239