कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते "कोविड-19 वरील प्रतिसाद आणि तक्रारींसाठी अभिप्राय कॉल सेंटर्स"चे उद्घाटन
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने 1 लाख कोविड-19 सार्वजनिक तक्रारींचे निवारण करून महत्वाचा टप्पा ओलांडल्याबद्दल केले अभिनंदन
Posted On:
15 JUN 2020 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2020
केंद्रीय कार्मिक ,सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी "सार्वजनिक तक्रारींसाठी अभिप्राय कॉल सेंटर्स" चे उद्घाटन करून ज्या नागरीकांच्या तक्रारींचे यशस्वी निवारण झाले आहे त्यांच्याशी सार्वजनिक तक्रारींच्या राष्ट्रीय केंद्रावरून संवाद साधला. आत्तापर्यंत एक लाख कोविड-19 सार्वजनिक तक्रारींचे निवारण केल्याबद्दल त्यांनी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे (DARPG) अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सामान्य माणसांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सिंग यावेळी म्हणाले.
ज्यांनी कोविड-19 संबंधी तक्रारी केल्या होत्या, त्यांच्याशीच एखाद्या वरिष्ठ मंत्र्यांने थेट संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे, तसेच त्यांनी इतर मंत्रालयांनाही उपयोगी पडेल असा अभिप्राय देण्याची व्यवस्था, तसेच नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.
डीएआरपीजीने बीएसएनएलच्या सहकार्याने 1406 कॉल सेंटर ऑपरेटर्सना सोबत घेऊन भुवनेश्वर, गुवाहाटी, जमशेदपूर, बडोदा, अहमदाबाद, लखनऊ, अजमेर, गुंटूर, कोईम्बतूर आणि गुंटकल या ठिकाणी अभिप्राय केंद्र सुरु केली आहेत.
फीडबॅक कॉल सेंटर कोविड-19 विषयी तक्रार केलेल्या 1.28 लाख लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रतिक्रीया देण्यास सांगतील ज्या CPGRAMS वर 30 मार्च 2020 ते 30 मे 202 दरम्यान नोंदवल्या आहेत. कॉल सेंटर संचालकांना फीडबॅक प्रश्नावलीसंदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे काम 9-10 जून 2020 रोजी पूर्ण झाले आहे. फीडबॅक कॉल सेंटर हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, पंजाबी, कन्नड, कोंकणी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, ओडिया, बंगाली, आसामी आणि राजस्थानी भाषांमधून कार्यरत आहेत.
कोविड-19 राष्ट्रीय मॉनिटरवर 3 दिवसांत तक्रारींचे निवारण झालेल्या 4 नागरीकांशी डॉ जितेंद्र सिंग यांनी यावेळी स्वत: संवाद साधला. यात a) कर्नाटक राज्यातील विजापूर येथील रहिवासी श्रीमती रेणूका पारसअप्पागोल यांच्या कॅनरा बँकेतून पैसे परत मिळण्याविषयीच्या तक्रारीचे आर्थिक सेवा विभागाकडून निवारण, b) गुजरातमधील बडोदा येथील श्री. गोरधनभाई जेठाभाई पटेल यांची मासिक गुंतवणूक पूर्ण झाल्यावर मिळणारा परतावा मिळण्याबाबत टपाल खात्याकडून निवारण, c) दिल्लीतील रहिवासी श्री.लक्ष्मीनारायण यांच्या मुलीच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वाईन संबंधी तक्रारीचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून निवारण आणि d) तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी श्री. मृत्यूंजयन यांची मासिक हप्ता स्वीकारण्याबाबतच्या तक्रारीचे टपाल विभागाकडून निवारण यांचा समावेश होता. या नागरीकांनी डॉ जितेंद्र सिंग यांना सांगितले की, कोविड-19 सार्वजनिक तक्रार राष्ट्रीय मॉनिटरची माहिती त्यांना डॉ. जितेंद्र सिंग यांच्या ट्वीट्स आणि विधानांमधून मिळाली आणि वेळेत तक्रारींचे निवारण झाल्याबद्दल सरकारचे आभार मानले.
या वेळी बोलताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, की मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सीपीजीआरएमएसमधे आमुलाग्र सुधारणा आणि बदल झाले असून त्यामुळे भारतातील तक्रार निवारणाची व्याप्ती वाढली आहे. सीपीजीआरएमएसमध्ये तक्रार निवारण्याच्या बाबतीत केलेल्या सुधारणांमधे, आघाडीची 20 मंत्रालये आणि विभागांना शेवटच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यासोबत जोडले जाणे, सर्व फीडबॅक केंद्रांचे, राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या तक्रार निवारण पोर्टलचे सीपीजीआरएएमएस बरोबर एकत्रीकरण करणे अशा सुधारणांचा समावेश आहे. कोविड-19 महामारीने भारतीय नागरीकांना सक्षम करण्यासाठी डिजीटल संधींचे दालन खुले झाले असून येणाऱ्या काळात डीएआरपीजीने या संकट काळाचे संधीत रुपांतर करायला हवे. डीएआरपीजीने या तक्रार निवारणाच्या हकीगतींचे यशस्वी संकलन करून त्यांचा प्रसार करावा, जेणेकरून सरकार याबाबत संवेदनशील आहे याची नागरीकांना खात्री पटेल.
या उद्घाटनप्रसंगी डीएआरपीजीचे सचिव डॉ के. शिवाजी, डीएआरपीजीचे अतिरिक्त सचिव व्ही. श्रीनिवास, बीएसएनएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री पी. के. पुरवर, डीएआरपीजीच्या संयुक्त सचिव श्रीमती जया दुबे, एम्स, टपाल, डीएआरपीजी आणि बीएसएनएलचे वरीष्ठ अधिकारी, बीएसएनएलच्या 1500 कॉल सेंटर्सचे संचालक आणि तक्रार निवारण झालेले नागरीक उपस्थित होते.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631777)
Visitor Counter : 287
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam