गृह मंत्रालय

दिल्लीतील कोविड -19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीतील तीन महानगरपालिकांचे महापौर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर आपल्याला देश आणि राष्ट्रीय राजधानी कोरोना मुक्त, निरोगी व समृद्ध बनवायची आहे: अमित शहा

गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांना तळागाळातील लोकांपर्यंत घरोघरी जाऊन सर्वेक्षण, कोरोना चाचणी इत्यादीची योग्य अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देश

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्ली सरकार, तिन्ही महापौर आणि दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांना एकत्र काम करण्यास सांगितले

Posted On: 14 JUN 2020 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जून 2020


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर आम्हाला देश आणि राष्ट्रीय राजधानी कोरोना मुक्त, निरोगी व समृद्ध करायची आहे, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. अमित शहा यांनी नवी दिल्लीत दिल्लीतील कोविड-19च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीतील तीन महानगरपालिकांचे महापौर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

तळागाळातील लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण, कोरोना चाचणी इत्यादी बाबतीत घेतलेल्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांना दिले. या बैठकीचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे परस्पर समन्वयाने कोरोनाविरूद्ध लढा जिंकणे आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

ते म्हणाले की, संबंधितांच्या सहकार्याने आणि समन्वयाने हे शक्य होईल. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्ली सरकार, तिन्ही महापौर आणि तीन महानगरपालिकांना एकत्र काम करण्यास सांगितले. सर्व मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, यासाठी गृहमंत्र्यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांनाही निर्देश दिले.

* * *

S.Pophale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631638) Visitor Counter : 213