संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालयाने कोविड-19 परिस्थितीमुळे देशांतर्गत उत्पादनाच्या भांडवल अधिग्रहण वितरणाला 4 महिन्यांची दिली मुदतवाढ

Posted On: 12 JUN 2020 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जून 2020

 

संरक्षण मंत्रालयाने, कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पुरवठा साखळी खंडित केल्यामुळे भारतीय विक्रेत्यांसोबत सध्या अस्तित्वात असलेल्या भांडवल अधिग्रहण कराराच्या वितरण कालावधीला 4 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिलेल्या यासंदर्भातील एक आदेश आज मंत्रालयाच्या अधिग्रहण शाखेने जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, “फोर्स मॅजेअर (सक्तीचा कलावधी) चार महिन्यांसाठी अर्थात 25 मार्च 2020 ते 24 जुलै 2020 पर्यंत लागू असेल.”

आदेशात नमूद केले आहे की, "कराराची उपकरणे / सेवा पुरवण्यात होणारी दिरंगाईची गणना आणि निर्धारित/तरल नुकसान शुल्काची आकारणी करताना हा सक्तीचा कालावधी वगळला जाईल."

या उपाययोजनांमुळे देशांतर्गत संरक्षण उद्योगांना मोठा दिलासा मिळेल, ज्यांचे उत्पादन वेळापत्रक कोविड-19 परिस्थितीमुळे बऱ्याच अंशी कोलमडले आहे.

मंत्रालयाच्या आदेशानुसार, भारतीय विक्रेता करारित वस्तू विस्तारित वितरण कालावधीत चांगल्या प्रकारे वितरीत करण्यास मुक्त आहेत. पुढे, आदेशानुसार, या निर्णयावर परिणाम होण्यासाठी स्वतंत्र कराराच्या विशिष्ट दुरुस्त्या करण्याची आवश्यकता नाही.

परदेशी विक्रेत्यांच्या संदर्भात ते संरक्षण मंत्रालयाकडे संपर्क साधू शकतात, जे त्यांच्या देशातील परिस्थितीच्या आधारे प्रकरणांचा विचार करू शकतात.


* * *

S.Pophale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631126) Visitor Counter : 296