रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे राज्य प्राधिकरणाला कोविड दक्षता केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज


तेलंगणाने सिकंदराबाद, काचीगुडा आणि आदिलाबाद या तीन ठिकाणी 60 कोच तैनात करण्याची केली विनंती

भारतीय रेल्वेकडे 5231 रेल्वे कोचेस कोविड दक्षता केंद्र म्हणून सज्ज

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन

कोविड विरुद्ध भारत सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ पुरविण्याचे भारतीय रेल्वेचे सर्वतोपरी प्रयत्न

Posted On: 11 JUN 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2020

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही राज्यांनी भारतीय रेल्वेकडे उपलब्ध कोविड दक्षता कोचची मागणी केली आहे. रेल्वेने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना या कोचेसचे वाटप केले आहे.

तेलंगणाने सिकंदराबाद, काचीगुडा आणि आदिलाबाद या तीन ठिकाणी 60 कोच तैनात करण्याची विनंती केली आहे. दिल्ली मध्ये 10 कोचेस तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

कोविड-19 विरुद्धचा लढा कायम ठेवत, भारतीय रेल्वे भारत सरकारच्या आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भारतीय रेल्वे त्याची 5231 कोविड दक्षता केंद्रे राज्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. परिमंडळ (क्षेत्रीय) रेल्वेने विलगीकरण सुविधेसाठी हे कोच रुपांतरीत केले आहेत.

कोचेसचा उपयोग सौम्य प्रकरणांसाठी केला जाऊ शकतो, जो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड दक्षता केंद्राकडे पाठवले जाऊ शकतात.  या कोचचा उपयोग जिथे राज्यांच्या सुविधा संपुष्टात आल्या आहेत आणि कोविडच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या दोन्ही प्रकरणांच्या विलगीकरणासाठीची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक आहे. या सुविधा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि नीती आयोगाने विकसित केलेल्या एकीकृत कोविड योजनेचा भाग आहेत.

215 स्थानकांपैकी, रेल्वेने 85 स्थानकांवर आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत, 130 स्थानकांवर कर्मचारी आणि आवश्यक औषधे पुरविण्यासाठी राज्यांनी सहमती दर्शविल्यास राज्य कोविड दक्षता कोचची मागणी करतील. भारतीय रेल्वेने या कोविड दक्षता केंद्रांसाठी पाणी आणि चार्जिंगची सुविधा असलेली 158 स्थानके आणि पाण्याची सुविधा असलेली 58 स्थानके सज्ज ठेवली आहेत.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630952) Visitor Counter : 220