आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची सद्यस्थिती
Posted On:
06 JUN 2020 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2020
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 4,611 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,14,073 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.20% वर पोहोचले आहे. आजमितीस 1,15,942 रुग्ण संक्रमित असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोशाळांची संख्या 520 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 222 पर्यंत (एकूण 742) वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1,37,938 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 45,24,317 आहे.
कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड-19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1629861)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam