ऊर्जा मंत्रालय

ऊर्जा मंत्र्यांनी केले जागतिक पर्यावरण दिनी #आयकमीट चे उद्‌घाटन

Posted On: 05 JUN 2020 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के.सिंग यांनी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून  #आयकमीट मोहिमेचे उद्घाटन केले. या मोहिमेचा उद्देश सर्व व्यक्ती आणि संबंधीत भागधारकांनी ऊर्जेचा कार्यक्षम वापर, ऊर्जेचे नूतनीकरण, मजबूत आणि लवचीकपणे करत पर्यावरणपूरक ऊर्जेच्या स्रोतांचा उपयोग भविष्यात करण्याची तळमळ बाळगावी हा आहे.

#आयकमीट मोहीम केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या एनर्जी एफिशियन्सी सर्विसेस लिमिटेड (EESL)अंतर्गत सरकारी, बहुपक्षीय आणि द्विपक्षीय संस्था, थिंक टँक्स आणि व्यक्ती अशा विभिन्न आस्थापनांना जोडणारा दुवा ठरेल.

आम्ही संपूर्ण देशभरातील ऊर्जा साखळीत बदल आणण्याच्या विचारात असून देशातील सर्व नागरीकांना 24x7 ऊर्जा पुरवठा आणि संरक्षण देण्यासाठी प्रयत्नरत आहोत, असे आर. के. सिंग आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. जागतिक पर्यावरणाच्या या दिनी #आयकमीट मोहिमेमुळे देशातील सरकारी आणि खासगी अशी दोन विभिन्न क्षेत्रे एकत्र काम करून देशातील ऊर्जेला वेगळा आयाम मिळवून देतील, असंही ते पुढे म्हणाले.

ऊर्जेचे नवे सर्वसमावेशक भविष्य घडविणे ही #आयकमीट मागची कल्पना आहे. त्यासाठी  आधी लवचिक आणि जलद ऊर्जेचे स्रोत तयार करायला हवेत. सुस्थितील ऊर्जा क्षेत्रामुळे देशातील सर्वांना ऊर्जेचा वापर आणि संरक्षण सहजपणे  करायला मिळेल.  ऊर्जा  व्यवस्थेत सतत होणारे बदल, नवनवीन कल्पना जसे सौर ऊर्जेवर वा वीजेवर चालणारी वाहनेविविध भागधारकांनी केलेले ऊर्जेतील सहयोग हा #आयकमीट मोहिमेचा केंद्रबिंदू आहे.

नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी मिशन 2020, फेम 1 आणि 2, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती  योजना सौभाग्य  योजना, उज्वल डिसकॉम ऍश्युरन्स योजना( UDAY), अटल डिस्ट्रिब्युशन सिस्टिम इंप्रुव्हमेंट, स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम, प्रधानमंत्री ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (KUSUM), सौर पार्क, छतावरच्या वीजवाहक  तारांच्या जाळ्या, उन्नतज्योती सर्वांसाठी परवडणारे एलईडी दिवे (UJALA), अटलज्योती योजना ( AJAY)  यासारख्या सरकारच्या विविध योजनांचा प्रसार #आयकमीट मोहिमेतून केला जाणार आहे.

 S.Thakur/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629756) Visitor Counter : 239