संरक्षण मंत्रालय

एअर मार्शल बी सुरेश पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम एडीसी यांनी हवाई दलाच्या हलवारा तळाला भेट दिली

Posted On: 03 JUN 2020 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020


एअर मार्शल बी सुरेश, एअर ऑफिसर कमांडिंग-इन चीफ (एओसी-इन-सी) , पश्चिमी हवाई कमांड यांनी  03 जून 2020 रोजी  हवाई दलाच्या हलवारा तळाला भेट दिली. आगमन झाल्यानंतर हलवारा हवाई दल तळचे  एअर ऑफिसर कमांडिंग, एअर कमोडोर ए भद्रा, यांनी त्यांचे स्वागत केले.

 

त्यांच्या भेटीदरम्यान, एओसी-इन-सी यांनी तळावरच्या महत्वाच्या केंद्रांची  पाहणी केली आणि परिचालन तयारीचा आढावा घेतला.  प्रचलित कोविड-19 महामारीविरोधात  केलेल्या सर्व उपायायोजनांचा त्यांनी आढावा घेतला. आपल्याला महामारीच्या धोक्यासह सुरक्षा धोक्यांचा सामना करावा लागत आहे याचा एओसी-इन-सी यांनी पुनरुच्चार केला आणि या आव्हानात्मक काळात काळजीपूर्वक नियोजन आणि संसाधनांचा वापर करून परिचालन क्षमता सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर  दिला.

एओसी-इन-सी यांनी तळावरील सर्व कर्मचार्‍यांच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल आणि कर्तव्याप्रति वचनबद्धतेची प्रशंसा केली. आणि या सद्य सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन तंदुरुस्त राहण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला.


* * *

R.Tidke/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629112) Visitor Counter : 156