रसायन आणि खते मंत्रालय
2020-21 च्या पहिल्या दोन महिन्यांत PMBJK ची 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची दणदणीत विक्री, 2019-20 मध्ये याच काळात विक्री मूल्य सुमारे 40 कोटी इतके
मार्च ते मे 2020 या काळात जनौषधी केंद्रांमधून, परवडण्याजोग्या किमतीतील औषधांची सुमारे 144 कोटी रुपयांची विक्री
Posted On:
01 JUN 2020 9:43PM by PIB Mumbai
PMBJK म्हणजेच प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांनी 2020-21 च्या पहिल्याच महिन्यात 100.40 कोटी रुपयांची दणदणीत विक्री करून दाखविण्यात यश मिळवले आहे. 2019-20 मध्ये याच काळात हा आकडा 44.60 कोटी रुपये इतका होता.
2020 च्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत या केंद्रांनी, परवडण्याजोग्या आणि दर्जेदार औषधांची अंदाजे 144 कोटी रुपयांची विक्री केली आहे. यामुळे कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांची सुमारे 800 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
"कोविड-19 साथरोगाच्या या कठीण काळात सर्वांना औषधे पूर्णपणे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत." अशी ग्वाही रसायन आणि उर्वरक मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिली आहे. PMBJP म्हणजेच प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना अमलात आणण्यात BPPI च्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल गौडा यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गरीब एवं मध्यम वर्ग की महिलाओं के स्वास्थ्य को और बेहतर बनाने की दिशा में #JanAushadhi केंद्रों द्वारा ₹1 में एक #SuvidhaSanitary पैड बेचा गया। #Lockdown अवधि (मार्च-मई) में ₹1.20 करोड़ नैपकिन्स उपलब्ध कराए गए। @pmbjpbppi के सभी #CoronaWarriors को अभिनन्दन। pic.twitter.com/7hz15qKahk
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) June 1, 2020
कोरोना साथरोगाच्या संकटसमयी, BPPI चे कर्मचारी, केंद्रांचे मालक, वितरक आणि अन्य भागीदार स्वतःहून पुढे आले आणि या रोगाशी लढण्यासाठी एकत्रित काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. PMBJK ही केंद्रे सुरु असून, त्यांचे काम नियमितपणे पूर्ण करत आहेत. तसेच BPPI देखील आपल्या भागीदार व ग्राहकांसोबत ठामपणे उभी आहे.
PMBJK मध्ये अत्यावश्यक औषधांचा पुरवठा विना-अडथळा व अखंड सुरु ठेवण्यासाठी BPPI ने वचनबद्धता व्यक्त केली आहे. लॉकडाउन सुरु असूनही केंद्रांनी एप्रिलमध्ये एका महिन्यातील विक्रीचा उच्चांक गाठत 52 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर मार्च-2020 मध्ये 42 कोटी रुपयांची विक्री केली आहे. मास्क, सॅनिटायझर, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, पॅरासिटामोल अशा सध्या अधिक मागणी असलेल्या औषधे व वस्तूंचा पुरेसा पुरवठा PMBJK केंद्रांमध्ये सांभाळला जात आहे. BPPI ने मार्च व एप्रिलमध्ये जवळपास 10 लाख मास्क आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन च्या 50 लाख गोळ्यांची विक्री केली आहे. बाजारातील सध्याची मागणी लक्षात घेत पुढच्या सहा महिन्यांचा पुरेसा साठा करण्यासाठी BPPI ने खरेदीसाठी मागणीही करून ठेवली आहे. तसेच मित्रराष्ट्रांना पुरविण्यासाठीही BPPI ने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला या औषधांचा पुरवठा केला आहे.
लॉकडाउनच्या नियमांचे पालन करत देशाच्या 726 जिल्ह्यांमध्ये PMBJK ची 6300 पेक्षा अधिक केंद्रे सुरु आहेत. या केंद्रांमधील औषधविक्रेते आता 'आरोग्याशिपाई' म्हणून ओळखले जात असून सामाजिक अंतराच्या नियमांचे व्यवस्थित पालन करीत रुग्णांना व वृदधांना औषधांचा घरपोच पुरवठाही करत आहेत. समाजमाध्यमांद्वारेही BPPI कोरोनाविषयी जनजागृती करीत आहे. जनौषधी सुगम नावाचे मोबाईल ऍप लोकप्रिय होत चालले असून 4 लाखाहून अधिक जणांनी ते डाउनलोड करून घेतले आहे. अशाप्रकारे, कोरोनाविरुद्ध लढा देण्यात BPPI महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
M.Jaitly/J.Whaishmpayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628465)
Visitor Counter : 319